Next
‘झेन हॉस्पिटल’तर्फे ‘सायक्लोथॉन’चे आयोजन
डॉक्टर्स, रुग्णांसह पोलीसही अभियानात सहभागी
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:मुंबई : जागतिक हृदय दिनानिमित्त झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलतर्फे सुदृढ हृदयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी '#PedalforHeart' या सायक्लोथॉनचे आयोजन केले. या अभियानात १५० हून अधिक सहभागींनी सुदृढ जीवनशैलीबद्दल जागरुकता निर्माण केली; तसेच ४५ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सायक्लोथॉनला डॉ. ग्रीष्मा शहा, नेत्रविकार तज्ञ डॉ. डोनाल्ड लोबो, स्वस्तिक लॅबोरोटरीज आणि रेंट अ सायकल कंपनीचे विशेष सहकार्य लाभले.  

कामाचे अतिरिक्त तास, प्रवास आणि तणाव यांमुळे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉइड आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. दिवसाला केवळ ३० मिनिटे व्यायाम केला, तरी रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरील ताणही कमी होऊन उपयुक्त एचडीएलमध्ये वाढ होते. परिणामी, रक्तवाहिन्यांमधून अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते आणि ती चरबी पुढील प्रक्रियेसाठी यकृतामध्ये पाठविण्यात येते.  

झेन हॉस्पिटलमधील सल्लागार हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नारायण गडकर म्हणाले, ‘आजच्या काळात आपल्याला आपल्यासाठी म्हणून फार कमी वेळ असतो. तरुण पिढीचे लक्ष त्यांच्या करिअरवर केंद्रीत असते. त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे २०-४० या वयोगटात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. या आधी ४० वर्षांवरील व्यक्तीला हृदयविकार झाल्याचे निदर्शनास येत असे; पण आता व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला असणारे अपाय वाढले आहेत.’

‘सर्व वयोगटांसाठी आणि सर्व प्रकारच्या शारीरिक बांध्यासाठी सायकलिंग हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. सायकलिंगमुळे कॅलरी कमी होतात, वजनावर नियंत्रण राहते, स्टॅमिना वाढतो आणि स्नायू व हाडांची बळकटी वाढते. त्याचप्रमाणे एखादे उद्यान किंवा मोकळ्या रस्त्यावर सायकल चालवली तर हा तणावमुक्त करणारा व्यायाम असतो. नियमित सायकलिंग केल्यामुळे तुमचे हृदय, फुफ्फुसे आणि रक्ताभिसरणाला चालना देते. परिणामी, हृदयविकारांची शक्यता कमी होते,’ अशी पुष्टीही डॉ. गडकर यांनी जोडली.

झेन हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, ‘आजच्या काळात हृदयविकार ही कळीची समस्या होऊन राहिली आहे. प्राथमिक काळजी आणि खबरदारीचे उपाय याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही झेन हॉस्पिटलतर्फे पुढाकार घेतला. पोलीस अधिकारी, सामान्य नागरिक, डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या स्वत:च्या हृदयासाठी एक पाऊल पुढे टाकले. आपला परिसर तणावमुक्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search