Next
‘आयसीएआय’तर्फे प्रत्यक्ष करविषयक राष्ट्रीय परिषद
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this story

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे विभागातर्फे डायरेक्ट टॅक्सेस कमिटीच्या सहकार्याने प्रत्यक्ष करांवर (डायरेक्ट टॅक्सेस) दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दि. १६ आणि रविवार, दि. १७ जून रोजी कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणातील विवेकानंद सभागृहात ही परिषद होणार आहे. जवळपास नऊशे लोक या परिषदेत सहभागी होत आहेत.

‘या परिषदेचे उद्घाटन शनिवारी, दि. १६ जून रोजी सकाळी ९.४५ वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. या वेळी गिरीश अहुजा,  गौतम नाय,  राजन वोरा,  तरुण घिया,  रजनीश व्होरा,  मिलीन कोठारी,  अमित पटेल आणि नटवर ठक्रार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. चार्टर्ड अकाउंटंट्स सभासदांना प्रोत्साहित करून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले आहे’, अशी माहिती आयसीएआयच्या डायरेक्ट टॅक्सेस कमिटीचे चेअरमन सीए तरुण घिया, आयसीएआयच्या पुणे विभागाचे चेअरमन आनंद जखोटिया, सीए रेखा धामणकर यांनी दिली.

‘बदलत्या कारप्रणालीनुसार या परिषदेची रचना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ लोकांना बोलाविण्यात आले आहे. आयसीएआयचा पुणे विभाग पश्चिम विभागीय मंडळाच्या अखत्यारीत १९६२ पासून कार्यरत आहे. सात हजार ५०० पेक्षा अधिक सभासद असून, विविध मार्गदर्शनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात’, असे आनंद जखोटिया यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link