Next
‘होंडा एशियन जर्नी’मध्ये भारतीय रायडर्सचा सहभाग
प्रेस रिलीज
Thursday, November 15 | 03:17 PM
15 0 0
Share this story



पेनंग (मलेशिया) : आशिया व ओशियाना प्रदेशातील होंडा समूह कंपन्यांनी ‘होंडा एशियन जर्नी २०१८’ (एचएजे) या ‘होंडा बिग बाइक कारवाँ’चा यशस्वी समारोप नुकताच झाला. पेनिन्सुलर मलेशियापासून या प्रवासाला सुरुवात होऊन मलेशियन ग्रँड प्रिक्स (मोटोजीपी) येथे सांगता झाली.

भारतात मोटरस्पोर्ट्स लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने, होंडा टू-व्हीलर्स इंडियाने सात भारतीय रायडर्सना ‘होंडा एशियन जर्नी’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहभागी होण्याची व आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली. या मोठ्या प्रवासाला पेनांग येथील स्टेडिअम बातु कवन येथून सुरुवात झाली. तेथे भारतातील सात व अन्य देशांतील रायडर्स सुरक्षाविषयक सत्रासाठी एकत्र आले होते. रायडर्सनी नवी गोल्डविंग, आफ्रिका ट्विन, सीबी१०००आर, व सीबी११०० या होंडाच्या नव्या बिग बाइक्सवर प्रवास करण्याचा अनुभव घेतला.

भारत, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया व फिलिपिन्स या सहा देशांतील सहयोगींसह ग्राहक, पत्रकार आणि होंडा डीलर्सचा समावेश असलेल्या ६० हून अधिक रायडर्सनी सेपंग इंटरनॅशनल सर्किट या अंतिम ठिकाण पोहोचताना मार्गात होंडा बिग बाइक चालवण्याचा आनंद घेतला.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (भारत), बून स्यू होंडा एसडीएन बीएचडी (मलेशिया), पीटी अस्ट्रा होंडा मोटर (इंडोनेशिया), ए. पी. होंडा कंपनी लिमिटेड (थायलंड), होंडा व्हिएतनाम कंपनी लिमिटेड (व्हिएतनाम), होंडा फिलिपिन्स इंक. (फिलिपिन्स) आणि होंडा एशिया अँड ओशियाना प्रदेशासाठी प्रादेशिक मुख्यालय एशियन होंडा मोटर कंपनी लिमिटेड या आशिया व ओशियाना प्रदेशातील होंडा समूह कंपन्यांनी ‘होंडा एशियन जर्नी २०१८’चे आयोजन केले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link