Next
‘रसना’तर्फे ‘रसना मसाला ऑरेंज’ बाजारात
प्रेस रिलीज
Tuesday, March 06, 2018 | 03:55 PM
15 0 0
Share this story

मुंबई : हा उन्हाळा मसालेदार बनवण्यासाठी ‘रसना’ने नवीन ‘रसना मसाला ऑरेंज’ फ्लेवर बाजारात आणला आहे. ‘रसना’ जगातील सर्वात मोठी शीतपेयाची कंपनी असून ५३ देशांमध्ये ती उपलब्ध आहे आणि भारतात १.६ मिलियन आउटलेट्स आहेत. या नवीन मसालेदार फ्लेवरची ब्रँड अँबेसॅडर प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खान ही आहे.

‘रसना मसाला ऑरेंज’चा शुभारंभ करताना ‘रसना’चे अध्यक्ष आणि एमडी पिरुझ खंबाटा, म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून आम्ही अनोखे, आरोग्यदायक आणि स्वादिष्ट फ्रूट ड्रिंक देत आहोत, ज्याची किंमतही रास्त असते. आता ‘रसना मसाला ऑरेंज’ देत असून, ते आरोग्यदायक आहे. त्याचा स्वाद नागपूरच्या संत्र्यांसारखा आहे. करिना कपूर ही टिकाकारांनीही कौतुक केलेली अभिनेत्री असून, ती दर्जामध्ये विश्‍वास ठेवते. आपण मसालेदार ड्रिंक्सच्या नव्या युगात प्रवेश करताना करिना कपूर आम्हाला ब्रँड अँबेसॅडर म्हणून योग्य वाटली. आता ‘रसना मसाला ऑरेंज’ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे.’

‘रसना’शी नवे नातेसंबंध जोडताना आणि ‘रसना मसाला ऑरेंज’चा स्वाद चाखून करिना कपूर-खान म्हणाली, ‘मसालेदार बर्गर्स असोत, पिझ्झा किंवा सँडविचेस असोत भारतात प्रत्येकाला मसालेदार खायला आवडते. देशात पहिल्यांदाच आपल्याला ‘रसना मसाला ऑरेंज’च्या रूपात मसालेदार ड्रिंक मिळणार आहे. ‘रसना’सोबत राहताना मला अभिमान वाटत आहे. कारण ‘रसना’ आपल्याला चटपटीत ऑरेंज ड्रिंक देत आहे, जे आपल्या सर्वांना खूप आवडेल. ‘रसना मसाला ऑरेंज’ हे उत्तम पाचक आहे, टेस्ट बड्ससाठी भूकवर्धकही आहे. हे ड्रिंक मुले केव्हाही, कोणत्याही प्रसंगी पिऊ शकतात.’

‘रसना मसाला ऑरेंज’ हे अनोखे प्रॉडक्ट पहिल्यांदाच तयार होत आहे. ज्यात अस्सल ज्यूस आणि काळी मिरी, दालचिनी, आले, जिरे, लाल मिरची, मिंट आणि बडीशेप असे मसाले आहेत. अशाप्रकारचा ‘रसना’ तयार करण्यासाठी ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभाग सहा महिने ग्राहकांसोबत अभ्यास करत होता. आता ‘रसना मसाला ऑरेंज’ चार पॅक आकारात उपलब्ध होईल. ३२ ग्लासचा पॅक ४० रुपयांना, १२ ग्लास पॅक १० रुपयांना, एक ग्लास पाच रुपयांना आणि दोन रुपयांना (साखरेविना) मिळेल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘रसना’ने मागील काही वर्षांपासून ‘एमआरपी’मध्ये वाढ केलेली नाही आणि आजही ‘रसना’चा एक ग्लास दोन रुपये ३७ पैशांमध्ये मिळतो. एका प्रख्यात राष्ट्रीय एजन्सीने केलेल्या संशोधनामध्ये ‘रसना’ सर्वांत जास्त आठवले जाणारे ऑरेंज ड्रिंक ठरले आहे. ‘रसना’साठी हे एक मोठे यश आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link