Next
‘आयसीआयसीआय’ आणि ‘गोआयबीबो’तर्फे को-ब्रँडेड ट्रॅव्हल कार्ड दाखल
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 11:17 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवासाचे वाढते प्रमाण विचारात घेऊन प्रवाशांना परदेशी प्रवासात विनाअडथळा आर्थिक फायदे मिळावेत, या हेतूने ‘आयसीआयसीआय बँके’ने देशातील ‘गोआयबीबो’ या ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग कंपनीच्या सहकार्याने को-ब्रँडेड मल्टिकरन्सी ट्रॅव्हल कार्ड दाखल केले आहे. ‘आयसीआयसीआय बँके’त बचत खाते असलेली किंवा नसलेली कोणतीही व्यक्ती परदेशी प्रवासासाठी जात असल्यास तिला ‘गोआयबीबो’ वेबसाइटवर व मोबाइल अॅपवर ‘गोआयबीबो आयसीआयसीआय बँक ट्रॅव्हल कार्ड’साठी डिजिटल पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जगभरातील २०० देशांत व ४६ दशलक्ष मर्चंटकडे स्वीकारल्या जाणाऱ्या या कार्डामध्ये जास्तीत जास्त १५ चलनांतील रक्कम भरता येणे शक्य आहे.  

कार्डमध्ये २० हजार रुपयांपर्यंतच्या लाभांचा समावेश केलेला असून, त्यामध्ये ‘गोआयबीबो’कडून १५ हजार रुपयांच्या गिफ्ट व्हाउटरचा व अन्य लाभांचा समावेश आहे आणि हे लाभ ट्रॅव्हल साइटवर विमानाचे व हॉटेलचे बुकिंग करण्यासाठी वापरता येऊ शकतात. याबरोबर, ग्राहकांना किमान एक हजार डॉलर लोड करत असताना, चलन रूपांतराच्या दरामध्ये ४० पैसे सवलत मिळू शकेल; तसेच त्यांना चोरी किंवा हरवणे यापासून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत कार्ड प्रोटेक्शन हा लाभ मिळेल. परदेशातील सहा शहरांतील १००हून अधिक भारतीय रेस्टॉरंटमध्ये १५ टक्के सवलतही मिळणार आहे. ट्रॅव्हल कार्डमध्ये समाविष्ट केलेल्या चलनांचे व्यवस्थापन सुरळीतपणे करण्यासाठी, हे कार्ड बँकेच्या इंटरनेट पोर्टलद्वारे ग्राहकांना एका चलनातील रक्कम तातडीने दुसऱ्या चलनात रूपांतरित करण्याची सेवा देत असून, बँकेच्या मोबाइल व इंटरनेट बँकिंग सुविधेच्या मदतीने कार्डामध्ये केव्हाही, कोठूनही पैसे भरणे शक्य आहे. 

यानिमित्त बोलताना आयसीआयसीआय बँकेचे अनसिक्युअर्ड अॅसेट्स, क्रेडिट कार्ड व पर्सनल लोन हेड सुदीप्त रॉय म्हणाले, ‘आमचे पहिले को-ब्रँडेड मल्टि-करन्सी ट्रॅव्हल कार्ड दाखल करण्यासाठी ‘गोआयबीबो’शी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही सादर केलेल्या उत्पादनांच्या केंद्रस्थानी नेहमी ग्राहक असतात. त्यामुळे, आम्ही सातत्याने त्यांना अधिकाधिक सोय व जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करतो. याच विचाराच्या अनुषंगाने नवे उत्पादन दाखल केले आहे.’

‘वाढत्या श्रेणीला सेवा देण्यासाठी, आम्ही अधिक सोय व अनेक फायदे देणारे कार्ड दाखल केले आहे. ‘गोआयबीबो आयसीआयसीआय बँक ट्रॅव्हल कार्डा’मध्ये जास्तीत जास्त १५ चलनांचा समावेश करून विविध देशांमध्ये एकच वापरणे शक्य होणार असून, यात सर्वोत्तम सेवाही दिल्या जाणार आहेत; तसेच काही तपशील भरून, ‘गोआयबीबो’च्या साइटवरून व मोबाइल अॅपवरून कार्डासाठी सहज अर्ज करता येईल. को-ब्रँडेड ट्रॅव्हल कार्डव्यतिरिक्त, आम्ही प्रवासप्रेमी ग्राहकांना सॅफिरो ट्रॅव्हल कार्ड व कोरल ट्रॅव्हल कार्ड अशी उत्पादनेही देतो. आम्हाला भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी नवीन आयाम निर्माण करायचा आहे आणि बँकेच्या ट्रॅव्हल कार्ड पोर्टफोलिओच्या वाढीमध्ये योगदान द्यायचे आहे,’ असेही रॉय यांनी सांगितले.

‘गोआयबीबो’चे चीफ बिझनेस ऑफिसर सौजन्य श्रीवास्तव म्हणाले, ‘लिजर किंवा बिझनेस या निमित्ताने परदेशी जाण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढले असून, ते चलनाचे रूपांतर करण्यासाठीच्या त्रासाविना पेमेंट करण्यासाठी सातत्याने सोयीच्या व सुरक्षित पद्धतीच्या शोधात असतात. प्रवास अधिक लाभदायक बनवण्याच्या हेतूने, आम्हाला अत्याधुनिक प्रवाशांना अतिशय अर्थपूर्ण व मोलाच्या सेवा, तसेच त्यांच्या गरजेनुसार सेवा देता याव्यात, या हेतूने आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search