Next
एका ‘ढ’ मुलाची गोष्ट!
BOI
Thursday, October 26, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सचिन उषा विलास जोशी

स्वतः शाळेत असताना जेमतेम पास होणाऱ्या नाशिकच्या सचिन जोशी नावाच्या एका तरुणानं नाशिकमध्ये इस्पॅलियर नावाची शाळा काढली आहे. ती पठडीतल्या शाळांपेक्षा वेगळी, कल्पक आहे. या शाळेतली मुलं रुक्ष चेहऱ्यानं नव्हे, तर आपल्या कृतीतून शिकतात. तिथं अभ्यास हा अभ्यास न राहता आनंददायी जगण्याचा भाग बनतो. अशा शाळेत जायला कोणाला आवडणार नाही? ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज भेटू या सचिन उषा विलास जोशी या अवलियाला...
................
शाळेत जाण्यापूर्वी शाळेत जाण्याचं वेड प्रत्येकालाच लागलेलं असतं. तो नवा नवा गणवेष, ती सुंदरशी वॉटरबॅग, ते नवीन दप्तर, नवीकोरी पुस्तकं आणि वह्या, छान छान कलर बॉक्स आणि पेन, पेन्सिली आणि आकर्षक खोडरबर, आईनं दिलेला आवडीचा डबा... या सगळ्या जय्यत तयारीनिशी शाळेत कधी एकदा जाऊ असं झालेलं असतं; पण शाळेत गेल्यानंतर सगळाच भ्रमनिरास होतो. स्वप्नांची फुलपाखरं तडतड करत समोरच मरून पडतात. शाळेचं ते प्रवेशद्वार, त्या भिंती, ते वर्ग, ते बेंच, ते शिक्षक सगळेच कसे क्रूर वाटू लागतात. शाळा म्हणजे कोंडवाडा असं मनावर पक्कं बिंबलं जातं. शिक्षकांचे ते शिस्तकठोर चेहरे बघून मनात धडकी भरते आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ‘नको ती शाळा’ इतकंच काय ते मन सांगत राहतं. म्हणूनच तर 

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, 
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय 

हे गाणं जवळचं वाटू लागतं. काहीतरी होऊन शाळेत जाणं कसं टळेल याचाच विचार मन रात्रंदिवस करू लागतं. 

जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो आपल्यासारखाच होता. म्हणजे फक्त शाळेत जाण्याच्या बाबतीत हं. इतर बाबतीत तो खूपच ग्रेट होता. पिकासोला शाळेत जायला मुळीच आवडायचं नाही. फळ्यावर लिहिलेली आकडेमोड त्याला काही केल्या समजायची नाही. शाळा कधी सुटेल, घंटी कधी वाजेल याची तो वाट बघत राहायचा. शाळेत न जाण्यासाठी तो रोज नवनवीन कारणं शोधून काढायचा. कधी पोट दुखतंय, तर कधी डोकं दुखतंय, कधी ताप आल्यासारखं वाटतंय तर कधी काही... अगदीच कुठलंच कारण चालत नाही असं लक्षात आलं, तर मात्र मग तो आणखी एक अस्त्र काढायचा. आईला म्हणायचा, ‘मला कबुतर घेऊन शाळेत जाऊ दिलं तरच मी शाळेत जाईन.’ पिकासोला कबुतर खूप आवडायचं. शाळेत गेल्यावर त्या दुःखदायक वातावरणात तेवढाच विरंगुळा बरोबर असला तर बरं असं त्याला वाटतं असावं. तीही मात्रा लागू पडली नाही, तर मग पिकासो आई-वडिलांच्या तावडीतून सुटून पळ काढायचा. त्याच्या मागे धावाधाव करून त्याला पकडून जबरदस्तीने आंघोळ घालून त्याला कसंबसं शाळेत पाठवण्याची कसरत त्याच्या आई-वडिलांना रोजच करावी लागे. 

पिकासो काय किंवा आपण सगळेच काय... प्रत्येकालाच हा भोलानाथ भेटून शाळेचं एकदाच काय ते बरं-वाईट करून टाकावं असं का वाटतं बरं? ही शाळा तुरुंगासारखी वाटून तिची भीती मनात का बसते? तो अभ्यास, गृहपाठ, पाठांतर का नको वाटतं? या नकोशा प्रश्नांअची उत्तरं शोधण्याऐवजी हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रश्नां ची उत्तरं शोधली तर? मी ती शोधली आहेत. आणि हो, माझ्याबरोबर नाशिकच्या अनेक मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी शोधली आहेत. कशी? 

उत्तर एकच आहे... त्यासाठी थोडा बदल करून वरचं गाणं पुन्हा एकदा म्हणावं लागेल,

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,
इस्पॅलियरमध्ये भिजत जायला मज्जा येणार हाय
सांग सांग भोलानाथ बरोबर येणार काय...

इस्पॅलियर शाळेचं तत्त्वज्ञान

नाशिकच्या सचिन जोशी नावाच्या एका गोड तरुणानं इस्पॅलियर नावाची एक शाळा काढली आहे. तिच्या बाबतीत असंच गाणं म्हणावं लागेल. खरं तर इस्पॅलियरला शाळा कसं म्हणावं हाच मुळी प्रश्नब आहे. ही शाळा नसून ‘मस्ती की पाठशाला’ आहे. पठडीतल्या शाळांपेक्षा वेगळी, कल्पक, सुंदर, स्वप्नातली... या शाळेतली मुलं पुस्तकी भाषेत, रुक्ष चेहऱ्यानं शिकत नाहीत. आपल्या कृतीतून ती शिकतात. चित्रं काढतात, भिंती रंगवतात, चिखल-मातीत हात घालून शिल्पं तयार करण्याच्या कामी गुंततात, नाचतात, गातात आणि अभिनयदेखील करतात. ईद, ख्रिसमस, दिवाळी असे सगळेच सण साजरे करतात. नागरिकशास्त्राचे नियम पुस्तकातून नव्हे, तर पुन्हा एकदा कृतीतून शिकतात. ट्रॅफिकचे नियम समजावून घेताना स्वतः रस्त्यावर चौकाचौकात जाऊन उभी राहतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काय काय घडतं याचं निरीक्षण करतात. पोलिस स्टेशनमध्ये काय काय घडतं हे बघण्यासाठी ही मुलं पोलिस स्टेशनला भेट देतात. पोलिस अधिकारी असलेल्या काकांशी गप्पा मारून सगळं काही जाणून घेतात. कधी भाजी मंडईला भेट देऊन भाजीवाल्यांचे व्यवहार बघतात, तर कधी स्वतःच भाजीवाले होऊन भाजी विकून खरी कमाई करून भाजीवाल्यांची सुख-दुःखं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. गाण्यातून गणित शिकतात, प्रयोगातूनच विज्ञान समजून घेतात. अभ्यास अभ्यास न राहता आनंददायी जगण्याचा भाग बनतो. अशा शाळेत शिक्षकही मुलांबरोबर रमतात, हसतात, खेळतात, नाचतात, बागडतात. शिक्षेची भीती दाखवत नाहीत. अशा शाळेत जायला कोणाला आवडणार नाही?

स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई
स्वप्नी माझ्या इस्पॅलियर ही शाळा पाहिली बाई
किलबिल किलबिल पक्षी बोलती...

शाळेच्या आवारात पुस्तकांच्या प्रतिकृती स्वागत करतात.वर्षभरापूर्वी सचिनच्या शाळेला भेट देण्याचा योग अचानक आला. प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताच परिसरात पुस्तकांच्या मोठमोठ्या प्रतिकृती हसून स्वागत करत होत्या. त्या रंगीबेरंगी प्रतिकृती ‘आमच्या सान्निध्यात जरा विसावून मग पुढे जा’ असं हसून सांगत होत्या. शाळेचं कार्यालय, शाळेची इमारत, शाळेमधल्या मूर्ती, चित्रं सगळंच कसं स्वप्नवत वाटत होतं. पुन्हा मन म्हणत होतं,लहानपण देगा देवा, इस्पॅलियरचा हवा ठेवा

आता इस्पॅलियर काय आहे आणि सचिन कोण आहे, हे जरा बघू या. सचिन जोशी या तरुणानं वाणिज्य शाखेची पदवी घेतली. म्हणजे बी. कॉम, एमपीएम, टॅक्सेशन लॉ, लेबर लॉ, एमबीए, सीएस अशा अनेक पदव्या घेतल्या. नाशिकच्या केटीएमएच कॉलेजमध्ये असतानाच त्याला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. जात-धर्म याबद्दलचे त्याचे विचार गळून मानवतावाद मनावर कायमचा ठसला. 

शाळेत असताना सचिन मुळीच हुशार नव्हता. गृहपाठ आणि अभ्यास न झाल्यामुळे शाळेतल्या शिक्षकांचा त्याला नेहमीच मार बसायचा. प्रत्येक घटक चाचणीत नापास होणारा, अबोल, कोणामध्ये फारसा न मिसळणारा, थोडक्यात व्यक्तिमत्व नसलेला असा रूढ अर्थाने ‘मठ्ठ’ मुलगा म्हणजे सचिन! सचिनला शाळेचे दिवस सगळ्यात वाईट वाटतात. 

प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि लेखिका दीपा देशमुख यांची 'इस्पॅलियर'ला भेट...एकदा सातवीच्या वर्गात असताना नाटक बसवायचं ठरलं आणि धोबी आणि त्याच्या गाढवाच्या गोष्टीवरचं नाटक करायचं ठरलं. साहेब, धोबी वगैरे पात्रांच्या भूमिका पटापट निश्चिरत झाल्या. गाढवाची भूमिका करायला कोणीच तयार नव्हतं. बाई म्हणाल्या, ‘वर्गात जो मुलगा गाढव आहे, त्याला आपण ही भूमिका देऊ.’ बाईंनी सचिनला उभं करून म्हटलं, ‘हे आपल्या नाटकातलं गाढव!’ सचिनला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं; पण बंड करायची ताकद त्याच्यात नव्हतीच. अशक्त, किडकिडीत असलेला सचिन सतत खोकत असायचा. या डांग्या खोकल्यामुळे याची स्मरणशक्ती गेली असणार, असा समज करून त्याला जेव्हा दहावीत कसेबसे ३९ टक्के मार्क मिळाले, तेव्हा घरच्यांनी त्याला फैलावर घेतलंच नाही. कारण हा हुशार नाही हे त्यांनी मान्यच केलं होतं. 

अशा वातावरणात वाढलेला, न्यूनगंडानं पछाडलेला सचिन कॉलेजला जायला लागला आणि कॉलेजच्या वातावरणानं त्याच्यात आमूलाग्र बदल घडवून आणला. बारावीत असताना सचिनला अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते श्याम मानव भेटले. त्यांच्याबरोबर काम करताना अनेक जुनाट विचार गळून पडले आणि नवीन विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन सचिननं अंधश्रद्धेच्या विरोधात काम करायला सुरुवात केली. अंधश्रद्धा चळवळ असो व हुंडाविरोधी चळवळ, सचिन या सगळ्यात हिरीरीने भाग घेऊ लागला. सतत ऐकणं, लोकांची मानसिकता समजून घेणं या गोष्टी करू लागला. श्याम मानव, अच्युत गोडबोले यांचा प्रभाव सचिनच्या आयुष्यावर पडला... व. पु. काळे म्हणतात, ‘कान व्हायला शिका.’ तसं सचिननं कान होण्याचं व्रत स्वीकारलं. या काळात तो सगळे काय म्हणताहेत हे ऐकत गेला, कानात साठवत गेला. खरं तर यातूनच तो घडतही चालला होता. 

सचिननं पुणे विद्यापीठातून आठ पदव्या घेतल्या. त्याचा आत्मविश्वास वाढला होता. त्या वेळी त्याला पु. ग. वैद्य भेटले. ‘नापासांची शाळा’ यावर त्यांचं काम चालू होतं. सचिनही मग त्यांच्याबरोबर काम करायला लागला. दहावीच्या मुलांशी बोलायला लागला. खरंच काही मुलं मठ्ठ असतात का... याविषयी मुलांशी संवाद साधू लागला. श्याम मानवांचा दृष्टिकोन आणि मानसशास्त्रावरचं सचिनचं वाचन झालं असल्यानं त्याला मुलांशी संवाद साधायला चांगलं जमत चाललं होतं. अडीच ते तीन लाख मुलांबरोबर सचिनचा संवाद झाला. यातूनच त्याच्या मनात कुठेतरी शाळेची बीजं रुजली. 

सचिनला वाटलं, जेवढ्या शाळा बघितल्या त्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि त्यांच्यामुळे मुलं ही सगळी गंभीर चेहऱ्यानं, ओझं घेऊन का वावरावीत? ‘घोका आणि ओका’ ही कुठली शिक्षणाची पद्धत? पहिलीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत ताण आणि ताणच घेऊन का जगायचं? या प्रश्नांनी त्याला अस्वस्थ केलं आणि त्यानं ठरवलं, की आपण शाळा काढायची. 

त्यानं सात लाखांचं कर्ज काढून पुण्यामध्ये सेनापती बापट रोडवर पासपोर्ट ऑफिससमोर तिथली एक इमारत भाडेतत्त्वावर घेऊन चक्क पूर्व प्राथमिक शाळा काढली. ही शाळा तीन वर्षं सुरळीत चालली. वडिलांनी सचिनला पाठिंबा दिला. इतरांनी मात्र सचिनला वेड्यात काढलं. अर्थातच सचिनचा निश्चबय पक्का होता. सचिननं याच दरम्यान शाहरूख खानची भूमिका असलेला ‘स्वदेस’ हा चित्रपट बघितला. त्याचं मन आता आणखी मोठी स्वप्नं बघू लागलं. त्यानं आपल्या शहरात म्हणजे नाशिकमध्ये शाळा काढायचं ठरवलं. सचिननं नाशिकमधल्या पालकांची मीटिंग घेतली. त्यांना आपली स्वप्नं बोलून दाखवली. ही स्वप्नं खरी करण्याकरिता पैसा लागणार होता. याच काळात सचिननं फिरत्या शाळा, डोअर स्टेप शाळेचे प्रयोग अभ्यासले होते. भारतातल्या अनेक प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या होत्या. पालकांना काय हवं, मला स्वतःला मुलांना काय द्यायचंय, मुलांना काय हवं असतं, शिक्षणाचा हेतू काय असला पाहिजे, शिक्षणाबाबत ओशोंचे विचार काय सांगतात, कृष्णमूर्ती काय म्हणतात, अनुभवातून शिक्षण घेतल्यानं काय होतं, शिक्षण पद्धतीत इमारत, शिक्षक, संस्थाचालक, पालक हे केंद्रस्थानी न ठेवता विद्यार्थी केंद्रस्थानी असला पाहिजे, अभ्यासक्रम रोजच्या जगण्याशी निगडित असला पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा सचिननं बारकाईनं विचार केला. कलेचं आयुष्यातलं स्थान काय, कला काय देते, मातीतून निर्माण होणारी, कनेक्ट करणारी थॉट प्रोसेस, महात्मा गांधींची ‘नई तालीम’ची विचारप्रणाली सचिनला खूपच भावली. गांधीजी काय म्हणताहेत, आइन्स्टाइनचं शिक्षणाविषयीचं म्हणणं काय आहे, हे त्यानं नीट समजावून घेतलं. 

पालकांनी आपल्या मुलांचं भवितव्य निश्चिंत मनानं सचिनकडे सोपवायचं ठरवलं आणि पालकांनी ८० लाख रुपयांचा निधी गोळा करून सचिनच्या हाती सुपूर्द केला. नाशिकला मटाले नावाचं एक मंगल कार्यालय पडिक पडून होतं. थोडक्यात ती वास्तू ‘खंडहर’ बनली होती. सचिननं आपल्या बायकोचे दागिने विकले, घर गहाण ठेवलं, बँकेकडून कर्ज काढलं आणि सगळी रक्कम या खंडहर झालेल्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी वापरली. बघता बघता स्वप्नातली एक सुंदर शाळा समोर उभी राहिली. मराठी शाळेसाठी सचिनला परवानगी न मिळाल्यानं त्याला इंग्रजी माध्यमातून शाळा सुरू करावी लागली. सचिन आणि त्याचे सहकारी या सगळ्यांच्या चर्चेतून शाळेचं नाव ‘इस्पॅलियर’ असं निश्चित झालं. ‘इस्पॅलियर’ हा फ्रेंच भाषेतला शब्द असून झाडाला आकार देणं किंवा झाडातली गुणवत्ता किंवा उत्पादकता वाढवण्याच्या प्रक्रियेला ‘इस्पॅलियर’ असं म्हणतात.

शाळा सुरू झाली. सचिन आणि टीमनं पूर्व प्राथमिक, प्राथमिकपासून मुलांचा अभ्यासक्रम खूप काळजीपूर्वक निश्चिित केला. उदाहरण द्यायचं झालं, तर ‘पूर्व प्राथमिक’साठी मेंढी कशी असते, बेडूक कसा उड्या मारतो, गाईचं दूध पांढरं का असतं, चांभार चपला-बूट कसे शिवतो, भाज्या कुठल्या असतात अशा सगळ्या गोष्टींची निरीक्षणं अभ्यासक्रमात ठेवली. वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना लिहायला द्यायचं नाही हे त्यांनी ठामपणे ठरवलं. 

चौथीपर्यंतची मुलं मनातले विचार मूर्त स्वरूपात आणून मूर्तिकला शिकायला लागली. यातून त्यांची ‘थॉट प्रोसेस’ विकसित होताना दिसून आली. चौथी ते सातवीच्या वर्गातली मुलं पथनाट्यात काम करू लागली. यातून त्यांची लोकांसमोर बोलण्याची, संवाद साधण्याची भीती नाहीशी होऊ लागली. शाळेच्या मोकळ्या जागेत शेतीसाठी जागा ठेवण्यात आली. पाच एकर जागेत मुलं ३५० क्विंटल गहू पिकवू लागली. हे करताना आपण काहीतरी भरीव करतोय याचा आत्मविश्वाटस त्यांच्यात निर्माण करण्याचं काम या कष्टप्रद कामानं निर्माण केलं. भूत असतं का, हे शोधण्यासाठी मुलं स्मशानभूमीची सहल करू लागली. एवढंच काय, पण पोटातलं बाळ कसं दिसतं, कागद कसा बनतो, वर्तमानपत्र कसं तयार होतं या सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडे जाऊन, प्रेसमध्ये जाऊन, कारखान्यात जाऊन मुलं अभ्यासू लागली. शंकानिरसन करून घेऊ लागली. गांधींचे विचार अंमलात आणून सचिननं अंबर चरखा शाळेत आणून सूतकताईचं काम सुरू केलं. मुलांना स्वावलंबनाचे धडे आपोआपच मिळत गेले. आठवीपासूनच्या मुलांना सामाजिक भान येत गेलं. ज्या भागात शाळेपर्यंत जायला बसेस नाहीत, त्या परिसरातली गुंड मुलं मुलींची छेडछाड करतात. त्याचं निरीक्षण करून शाळेतल्या मुलांनी बस स्टॉप मिळावा आणि बससेवा सुरू व्हावी यासाठी अर्ज आणि पाठपुरावा केला. 

‘इस्पॅलियर’च्या मुलांनी आपल्या जन्मदातीविषयीच्या भावनांचा आदर करत, आपली नावं बदलून घेतली. आपलं नाव आणि त्यानंतर आपल्या आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव असं लिहायला सुरुवात केली. सुमारे १० हजार मुलांनी आपली नावं कागदोपत्री स्वतःहून बदलली. वर्षातून दोन वेळा ‘रात्रीची शाळा’ उपक्रम सुरू झाला. सायंकाळी शेकोटी, नृत्य, गाणी असे कार्यक्रम या रात्रीच्या शाळेत होऊ लागले. मुलांमधले सुप्त गुण दिसून येत गेले. काही मान्यवरांच्या भेटी आणि त्यांचं कार्य जाणून घेण्यासाठी दहावीची मुलं अशा लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊ लागली. आसपासच्या परिसरातल्या समस्या काय आहेत, या गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करू लागली. इतकंच काय, पण वस्त्यावस्त्यातून प्रत्येक घरात पाणी किती लागतं, किती पाणी वाया जातं, स्वच्छतेची अवस्था काय आहे याविषयी अभ्यास करू लागली. रिपोर्टस् बनवू लागली. यातूनच मुलांनी आपल्या शाळेची स्वच्छता आपणच करायचा निर्णय घेतला. कुराण, कलमा, गायत्री मंत्र सर्वच मुलांनी अवगत केले. यातून परस्परांच्या धर्माविषयीची आदरभावना वाढली. 

मुलांची बालसभा भरायला लागली. मुलांना कुठल्याही खटकलेल्या गोष्टींची तक्रार करण्याचा अधिकार बालसभेनं दिला. चॉकलेटऐवजी सुका मेवा वापरण्याची पद्धत सुरू झाली. बहुसंख्य मुलांनी घरातला टीव्ही बघणं स्वतःहून बंद केलं. मुलांचंच नव्हे, तर शाळेतर्फे पालकांचंही स्नेहसंमेलन होऊ लागलं. यात मुलं, पालक, शिक्षक सगळेच सहभागी होऊ लागले. वयाच्या भिंती गळून पडल्या आणि सगळ्यांमधली जवळीक वाढीला लागली. प्रत्येक मुलामध्ये नेतृत्वगुण विकसित करणं हाही शाळेचा उद्देश आहे. त्यामुळे एक नेता असण्यापेक्षा गटाला मोठं करणं, संघभावना वाढीला लागणं या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जातं. महिन्यातून एकदा एक विद्यार्थी संपूर्ण वर्गाचा डबा आपल्या घरून घेऊन येतो. आज इस्पॅलियर शाळेतल्या मुलांकडे बघितलं, तर त्यांना विजेचं काम, सुतारकाम, गवंडी काम, रंगारी काम असं ‘सबकुछ’ येतं. त्याचबरोबर अभिनय, नृत्य आणि संगीत यातही ही मुलं कुशल होतआहेत.

शाळेचं अशा प्रकारचं काम सुरू असताना सर्वेक्षणात साडेचार हजार मुलं शाळाबाह्य असल्याचं लक्षात आलं. नाशिकमधल्या एका वस्तीत सय्यद कम्युनिटीमध्ये ती लोकं डॉक्टरांकडे जात नाहीत, शिक्षण घेत नाहीत, मुलीचा जन्म होताच तिसऱ्या दिवशीच तिचं लग्न ठरतं अशा अनेक गोष्टी सचिनला दिसून आल्या. या समाजातल्या सात पिढ्यातले कोणीही शिकलेले नव्हते. अशा वेळी समुदपदेशनानं त्यांच्याशी संवाद साधणं सुरू झालं. शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात यश मिळालं. त्यांना शाळेपर्यंत न आणता सचिननं फिरती शाळा सुरू करून त्यांच्या वस्तीपर्यंत ‘मोबाइल’ शाळा नेली. वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. फुटपाथवरच्या अनाथ मुलांशी संवाद साधला गेला. या फिरत्या शाळेच्या कामानं केलेल्या अभूतपूर्व कामाची दखल ‘लिम्का बुक’नं घेतली आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’नं पुरस्कारानं सन्मानित केलं. 

इस्पॅलियर या शाळेचं प्रगतिपुस्तक तर खूपच अनोखं आहे. खरं तर प्रगतिपुस्तक म्हटलं, की निळसर, पोपटी जाडसर कागदाचं, त्यावर चौकोन आखलेलं रुक्ष, कोरडं स्वरूप समोर येतं. त्यातल्या मार्कांच्या खाली असलेल्या लाल रेषा मनावर फटकारे मारत राहतात. हे प्रगतिपुस्तक इतरांबरोबरची तुलना करत असायचं; मात्र इस्पॅलियरचं प्रगतिपुस्तक म्हणजे एक पिवळ्याधमक रंगातलं ऊर्जेचं प्रतीक असलेलं ‘सूर्यफूल’ आहे. त्यात कुठेही गणिती मार्कांना जागा नाही. त्याउलट आपण वेगवेगळी कौशल्यं कशी मिळवलीत, याविषयी हे प्रगतिपुस्तक बोलतं. जणू काही आपला मित्रच असावा असं हे जपून ठेवावं असं देखणं प्रगतिपुस्तक आहे!

प्रत्येक वर्षी सचिनची शिक्षक मंडळी सचिनसह नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात गुंतून जाते. हा अभ्यासक्रम सर्जनशील आणि अनोखा असल्यानं अभ्यासक्रम तयार करताना ते काम काम न राहता आनंदाचा भाग बनतं. अभ्यासक्रमात मुलांचाही सहभाग आवर्जून घेतला जातो. विशेष म्हणजे इस्पॅलियर शाळेत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टचं झेंडावंदन शाळेचे सफाई कामगार करतात. यातून कष्टाला प्रतिष्ठा देण्याचं काम शाळा करते. 

सचिनची कल्पकता आणि नवनवीन उपक्रम राबवण्याचं कौशल्य रोजच बघायला मिळतं. त्याच्या कामात त्याला त्याचा स्टाफ, पालक आणि शिक्षक असे सगळेच आनंदानं साथ देतात. सचिन इतर ठिकाणीही व्याख्यानं देतो आणि शिक्षण कसं असावं याविषयी मार्गदर्शन करतो. नव्यानं सुरू होणाऱ्या अनेक शाळांचा अभ्यासक्रम तयार करण्यात साह्य करतो. शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी कार्यशाळा घेतो. शासनाच्या अनेक समित्यांवर तो कार्यरत आहे. सचिन आणि शाळा यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सचिनच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. 

विनोबा भावे म्हणतात, ‘शिक्षक आणि मुलं दोघंही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात. दोघेही विद्यार्थीच आहेत. जे दिले जात नाही ते शिक्षण. जे घेतले जाते, ज्याचा हिशेब ठेवला जाऊ शकतो किंवा ज्याची काही नोंद ठेवली जाऊ शकते, ते शिक्षण नाही. जीवनच शिक्षण आहे. कॅलरीचा खरा हिशेब कागदावर नव्हे, शरीरावरच दिसून येतो. जे अनुभवले, खाल्ले, पचले, रक्तात मुरले तेच शिक्षण.’

मित्रहो, एका ‘ढ’ मुलाची गोष्ट बघितलीत? या मुलानं आपलं आणि आसपासचं जग किती समृद्ध आणि अर्थपूर्ण केलंय. मुलांमधला मुलगा होऊन राहणारा सचिन, जमिनीवरती पावलं घट्ट रोवून तू स्वप्नातली नगरी शाळेच्या रूपात आमच्यासमोर आणून ठेवलीस. तुझ्याविषयीची कृतज्ञ भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. तुझी सगळी स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

अनवट वाटेवर चालणाऱ्या, महात्मा फुलेंचा वारसा जपणाऱ्या सचिन उषा विलास जोशीच्या इस्पॅलियर प्रयोगशील शाळेला एकदा जरूर भेट द्या. आपण काही मदत करू इच्छित असाल, तर जरूर करा. 

संपर्क : सचिन उषा विलास जोशी
मोबाइल :  ८९८३० ०१३१३, ८९८३३ ३५५५५
वेबसाइट :  www.espalierschool.com
ई-मेल : info@espalierschool.com 


- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kazi Sabiha About 149 Days ago
Great job sir
0
0
Varsha Sachin mandavkar About 239 Days ago
Sachin sir, mi tumcha Balmendu jadanghadan karyashala he youtube war ekal ani mala te khup awadal.Teva mala tumchyavishayi ajun janun gyayachi eccha zali. kharach tumch education ani veglyach vishyawar kelela tumach kam yal maza SALAM!
0
0
Manjusha Kiran Abhang About 328 Days ago
You are a great person.Hats of to u.I always fill to change our education system & u have did it.I would really like to send my children to ur school if it was in pune.& even join ur school as a teacher.If u plan such school in pune please inform me.I salute ur work.
0
0
pallavi deshmukh About
khup Chan sachin.tumhi khup sundar kaam kelay..mala ya shalela bhet dyayala nakki avadel.
0
0
pallavi yogesh deshmukh About
kharach khup khup sundar shala ahe.apan apalya mulachya garaja olakhun tyana yogya te shikshan dile pahije.....mala ya shalela bhet dyayala nakki avadel...hat's off to sachin..itakya pratikul paristititahi tumhi atishay dhirane aaj evadha motha kaam kelay ..kharach khupach Chan..
0
0
Mrs. Snehal Sunil Tupe About
I really appreciate the great work done by Sachin and his co-workers .We will like to visit the school
0
0
Darshan Thakare About
Really needed great initiative by Sachin sir.
0
0
हेमा About
I would love to visit the school .
0
0
Supriya patankar About
Hats off to you sachin sir. कुठून येत हे सगळं?? great...
0
0
Mrs.Mugdha Manohar Wanjale About
I am so much impressed after reading an article "Anwat watewarche watsaru"Now the question is why we are so much stick to our system of education?"As a parent I am also confused what to do if the children's are filling hectic or boring while studying.
1
0
Vilas D Raut. Vinchur About
खरेच *येथे कर माझे जुळती*🙏 नक्कीच भेट देनार👍
3
0
Dr. Rajesh Vidya Tushar Patel About
Really great work... proud to be friend of mine... always inspires me to do good things for children...
2
0
Sonali Vaidya About
I am so happy that so many sensitive people gave started taking child education so seriously. I am a homeschooling mom for my girls and left school for the reasons highlighted above. God bless you Sachin and team and may you get all the support that you need to keep this real time education movement on..looking forward to seeing your school in person and meet you team too.
1
0
Meera s.vaidya. About
Really good work and i would like to visit your school.
1
0
Aswale parshuram About
Soul's of Life school.
1
0
Anita Mehendale About
Great work by Sachin sir. Would like to visit your school.
1
0
Rashmi Haridas About
सचिन ह्यांच कौतूक करावं तेव्हढं थोडंच,शब्दातीत . तसेच दीपा तुमचेही आभार,तुम्ही इतकी छान माहिती दिलीत.हि शाळा पाह्यला नक्कीच आवंडे ल.
1
0
Vaishali prashant Ghodke About
Sachin, great work, Great inspiration, indeed. I want to visit your school with my staff members.
1
0
Prachi Shailesh kulkarni About
Khup chan upkram ahe. Sachin Joshi he DHA mulich nahi,he spashta hota Yamule samajatlya lokanchi mansikta badlayla madat hoil abhyasakade
1
0
Neha pokharankar About
Very good. Salute to Sachin sir for this great work.
2
0
Prakash Bari About
really great school. proud to Nasik.
1
0
Smita Vilas Apte About
खरंच अनोखं,उत्साहवर्धक,अनुभवशील कार्य!
1
0
dr pranita gujarathi About
really inspiring sachin.proud to be associate
1
0
Sachin Sadhale About
Very good . Present standard of education is deteriorated. This type of schools only create future of next generation . This is real need of our society. Salute to Sachin sir for this great work.
1
0
Kalpana Shailendra Kulkarni About
The idea of school is very very nice. I would like to visit the school.
1
0
तांबोळी मैमुन्निस्सा इकबाल About
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. खुपच छान मनाला भावली लिलाताई पाटील यांच्या सृजनानंदची आठवण आली सृजनानंदचे पुढचे पाउल
1
1
Sandhya patel About
Great,inspiring work.
1
0
सुनिल जोशी महाराज सोलापूर About
फारच छान वाटले शाळा 👍👍👍👍
1
0
Shahabad shsikh About
Khoop chan lekh ahe
1
0
Surekha arjunrao kale About
I want to visit to this school. I am also school teacher. Really this is ideal school.
1
0
Manasi Chavan About
Great! I hope every school follows the pattern of Espalier School.
1
0
संतोष यशवंतराव निगडे About
खूपच छान ! मुलांना केवळ पुस्तकी किडा न बनविता व्यवसायाभिमुख दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मंदिरास सलाम !
1
0
Tanvi Rahurkar About
Best wishes for your wide experiment. It's a very great achievement. All the best
2
0
anita kharat About
खूपच सुदंर शाळा दिसली दिपताईच्या लेखनीतून रवींद्रनाथ टागोरांच्या शाळेची आठवण झाली
1
0
Dr Vijay ghuge About
Very nice experiment best luck for future pl tell me adress of school
1
0
गीता पाडगावकर About
.......येथे'च' कर माझे जुळती
1
0
Maitreyee Bardhan. About
I m really very impressed with this article. Mr Sachin my hat's of to u.u need courage to take this step.My all go wishes for u r this school.I m born n brought up in Nasik now staying in pune if I get a chance to visit u r school I will definitely come.Once again All the best.
1
0
Mr. Mangaldas Uttam Nikam About
Activity based education Today's important need. Best Wishes for Espalier school's Founder & Teachers.
1
0
Swati Padhye About
Redeveopment of RM Bhatt School is under process. Please try to canvass to that school management for such type of education
0
0
Anil R. Madke About
Sachin sir's work is really inspiring.Its value is beyond words. His work is undoubtedly great but one thing is more important and that is Sachin sir himself. He was an average student at secondary level but there was a spark within him which made him able to do such a tremendous work. It also shows that our existed education system is hollow which is based on exams only. It can't measure the real potential of students. I salute to this work and give best wishes.
1
0
Ruchi Madhuri Rajesh Vartak. About
माझी दोन्ही मुले या शाळेत शिकतात याचा मला अभिमान आहे. खरच खूप छान आहे शाळा. अशा शाळेला आणि सरांना मनापासून शुभेच्छा.....
2
0
Leena About
Great! I hope every school follows the pattern of Espalier School.
2
0
ashwini gadhave About
Sachin sir hero ahet mule nakki Kay astat te sirana samajle fakt so sir tumhala salam
2
0
ashwini gadhave About
Sir 👍👍
1
0
Sujata Gupte About
खरच अशी शाळा मला किंवा माझ्या मुलाला मिळाली असती तर बालपण अधीकच आनंददायी, प्रगल्भ आणि समृद्ध झालं असतं. मनापासून शुभेच्छा ! Thank you Deepa Deshmukh for introducing this noble deed .
3
0
Khinvasara Pramod About
I found this great man in 2003-04 in Pune .After doing survey of verious nursery school I able to admit my son in his Kids - Wiz play group . I remember at that time also he was doing all the activity in such a small place . At that time he calls Vasudeva , camel ride , chocolate factory visit , parentes counselling , for left handed child work shop , all historical leaders Jayanti , public speech , palkhi procession and so many other activity in the school . Even today I take suggestions related to my children . In 2004 my son was awarded the most creative child award from him for thinking in a different pattern than others now I am realising that he was right. My sons thinks totally in a different way and we are very proud to be a part of his organisation in his initial days . My abide my heartiest wishes to SACHIN SIR to run this noble task of in putting the values in children and making India " MAHAN INDIA " . I salute to him & his organisa.
1
1
Asawari Kulkarni About
Wow....! This is a real HERO! Hats off to his creative thinking and logical implementation. Such creaqtors are really the need of the hour. Thanks a lot Deepa for introducing this noble deed.
2
0
Bhawana Kulkarni About
Bytes of India is truly taking efforts to bring some inspirational stories. I always look forward to read them. Congratulations and best wishes to the team if Bytes Of India. Keep posting.
3
0
Mrs suvarna sameer agashe About
Great sir, it's really interesting n a big thank u n congratulations for doing a hard work for the future of today's generation, my daughter too insist me "why I'm not in this school aai". Please keep it up n God luck for ur future work load .
2
0
Zakir Abdul gani Shaikh About
Mast sir
2
0
Shreeya Kulkarni About
Hearty congratulations Sachin. ... very inspiring ... Lot of things in your story are highly appreciated. Keep it up... I would like to contribute some time for this new education system of young kids... All best wishes are with you and your school....
1
1
Varsha Sathe About
लेख वाचून वाटले माझ्या मुलांच्या वेळी अशी शाळा असती तर
6
2

Select Language
Share Link
 
Search