Next
पाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के
BOI
Saturday, June 09 | 04:26 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८७.०७ टक्के लागला. या विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी भोसे (क.) केंद्रात चमकले. त्यामुळे या विद्यालयाने गुणवत्तावाढीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेस १४७ विद्यार्थी-विद्यार्थिनी बसले होते. त्यातील १२८ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यामध्ये प्रणवी प्रवीण गोडसे व प्रज्ज्वल देविदास नगरे या दोघांना ९६ टक्के समान गुण मिळाल्यामुळे ते दोघेही भोसे (क.) केंद्रात प्रथम क्रमांकाने पास झाले. रोहित दत्तात्रय राजगुरू याने तृतीय क्रमांक पटकावला. सोनाली सत्यवान मोरे (९३.८०) चतुर्थ, तर चैत्राली धोंडीरीम मोरे व सौरभ विष्णू जाधव (९३.२०) यांनी केंद्रात पाचवा नंबर पटकावला.

या वर्षी यंदा प्रथमच दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आठवर गेल्यामुळे पालकांकडून मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक होत आहे; तसेच पालकांतर्फे मुख्याध्यापक एस. एम. बागल व विषय शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी बी. एम. पुजारी, सोमनाथ जगताप, प्रदीप भोसले, अंकुश भोसले व श्री. गिरी उपस्थित होते.

भोसे केंद्रात ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेले विद्यार्थी असे : उत्कर्षा रामचंद्र कोरके (९३ टक्के), माधुरी चंद्रकांत क्षीरसागर (९२.२०) व शिवानी बाळासाहेब बिस्किटे (९०). या परीक्षेत ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० आहे, तर प्रथम श्रेणीत गुण मिळवणारे २९ विद्यार्थी आहेत. पालक व ग्रामस्थांनी शिक्षक व सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link