Next
राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन
प्रेस रिलीज
Friday, February 23 | 11:44 AM
15 0 0
Share this story

पुणे : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर आणि इंद्रायणी हँडलूम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनात हातमाग व्यावसायिकांना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

‘हे प्रदर्शन येत्या चार मार्चपर्यंत सुरू राहणार असून, विणलेल्या कपड्यांची खरेदी करण्याची संधी पुणेकरांना आणखी दहा दिवस मिळणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे प्रमुख बी. एच. झाडे यांनी दिली. या वेळी सहायक अधिकारी बाभुळगावकर उपस्थित होते.

बी. एच. झाडे म्हणाले, ‘१० फेब्रुवारीपासून आरटीओजवळील पुण्यातील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रोज दुपारी बारा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले आहे. हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हातमाग प्रदर्शन आयोजित केले जाते. हातमाग केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह, विणकरांच्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा, हातमाग कापडाची वैशिष्ट्ये व विविध डिझाइन्स ग्राहकांसमोर आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून होत आहे.’

‘महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, हरियाना, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली आदी १५ राज्यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू येथे खरेदी करता येतील. त्यामध्ये साड्या, शाल, चादरी, जॅकेट्स, पैठणी यासह अनेक प्रकारची कापडे येथे आहेत. हातमाग विणकर गरीब असले, तरी त्यांनी विणलेली कलाकुसर आणि कपडे अतिशय उंची आहेत. प्रदर्शन सुरु झाल्यापासून रोज २० ते २५ हजार लोक भेट देत असून, कोटी रुपयांमध्ये उलाढाल होत आहे. आपल्या कलाकुसरीचा मोबदला मिळत असल्याने विणकारही खुश आहेत. ग्राहकांना या प्रदर्शनात २० टक्के सवलतही दिली जात आहे. शेवटच्या काही दिवसात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध राज्यातील व्यावसायिकांनी नवीन माल आणला असून, त्यात अनेक प्रकारची वस्त्रे आहेत,’ असे झाडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link