Next
रत्नागिरीत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम
BOI
Thursday, May 02, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील राष्ट्रीय सेवा समितीअंतर्गत बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. हा संपूर्ण पदविका अभ्यासक्रम घंटाळी मित्रमंडळ संचालित योगविद्या प्रबोधिनी यांच्यामार्फत घेतला जाणार आहे. हा अभ्यासक्रम जून २०१९ ते मे २०२० या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी पाच ते ८.३० व रविवारी सकाळी ६.३० ते ११.३० अशा वेळेत (प्रस्तावित वेळा) घेतला जाईल.  

ठाणे येथील सुप्रसिद्ध दंत शल्यविशारद व मंडळाचे अनुभवी योगशिक्षक, डॉ. अजित ओक हे या संपूर्ण अभ्यासक्रमाचे प्रमुख असून, त्यांच्याबरोबर यशवंत जोशी, सुषमा सौंदत्तीकर, स्मिता कर्वे व इतर अनुभवी शिक्षकांचा चमू वर्षभर कार्यरत असणार आहे. एक वर्षाच्या या संपूर्ण अभ्रासक्रमाचे शुल्क १५ हजार रुपये आहे. या अभ्यासक्रमाचे सिलॅबस लवकरच राष्ट्रीय सेवा समितीच्या कार्यालयात उपलब्ध होईल.

घंटाळी मित्रमंडळ ही ठाणे येथे कार्यरत असणारी एक ख्यातनाम संस्था असून, सुमारे चार दशकांहून अधिक काळ योगविद्येच्या प्रसाराचे आणि प्रचाराचे काम सेवाभावी वृत्तीने करत आहे. योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे उर्फ स्वामी सत्यकर्मानंद यांच्यासारख्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या योग्याच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुमारे दोनशेहून अधिक शिक्षक करत आहेत. पैशांपेक्षाही समाधानाला प्राधान्य असल्याने ही संस्था आज संपूर्ण भारतभरात एक अग्रगण्य मानली जाते. 

दैनंदिन स्तरावर ठाणे व घाटकोपर येथे सुमारे १५ योगसाधना वर्ग घेतले जातात. योगाची उपयोजितता केंद्रस्थानी ठेऊन सुमारे ३०हून अधिक समाजोपयोगी प्रकल्प मंडळाने राबवले आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्प आंतरराष्ट्रीय योग संमेलनात प्रथम क्रमांकाने गौरवले गेले आहेत. बंदीजनांसाठी योग, गर्भवती महिलांसाठी योगंकुर प्रकल्प, मधुमेह प्रतिबंध, कॉम्पुटर व्हिजन सिंड्रोम, मासिक धर्म समस्या निवारण, उंचीवृद्धी, अभ्यास तणावाचे नियोजन करणारा मेधासंस्कार हे दीर्घकाळ यशस्वीरीत्या राबवलेले काही प्रकल्प आहेत.

योगप्रसारासाठी योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे हे ध्यानात घेऊन मंडळातर्फे एक वर्षाचा योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम राबवला जातो. प्रतिवर्षी जुलै ते जून असा बारा महिन्यांचा हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आहे. योगाची सैद्धांतिक बैठक, शरीररचना व कार्यविज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, प्रात्यक्षिक, योगाच्या पाठांचे नियोजन आणि एक महिन्याचा प्रत्यक्ष कार्यानुभव असा व्यापक पाया असणारा हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा साधक एक सक्षम योगशिक्षक नक्कीच बनतो, पण तो योगोपचार मात्र करू शकत नाही. 

रत्नागिरीत अवतरणार्‍या योगगंगेचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष म्हसकर यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मनोज जोशी About 62 Days ago
मुझे योग शिक्षण लेने की इच्छा है व आपके जो भी सामाजिक कार्य है इसमें अपना योगदान करने की इच्छा है मुजे जो जून महीने से योग शिक्षण सुरु हो रहा है उसमें सहभागी होने की इच्छा है
0
0

Select Language
Share Link
 
Search