Next
पाच वर्षांच्या अवनीची चित्रकला करतेय थक्क!
पुण्यात सुरू आहे प्रदर्शन; ११ ऑगस्टपर्यंत पाहता येणार
BOI
Friday, August 09, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:


पुणे : निळ्याशार समुद्रातील रंगीबेरंगी मासे... अवतीभोवती  सुंदर झाडे असलेले ट्री हाऊस... रंगीबेरंगी पक्षी... फुलपाखराच्या आकारातील कोलाज... हातांच्या ठशांनी साकारलेले सुंदर चित्र... अशा विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून अवघ्या पाच वर्षांच्या अवनीने आपले अनुभवविश्व कॅनव्हासवर साकारले आहे. या चिमुरडीची ही सुंदर चित्रे, तिची चित्रकलेतील समज बघून प्रेक्षक थक्क होत आहेत.


बालचित्रकार अवनी पंडित हिच्या चित्रांचे ‘सॅपलिंग स्पिरिट’ हे चित्र प्रदर्शन पुण्यातील औंध येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्सच्या कलादालनात सुरू आहे. हे चित्रप्रदर्शन रविवार, ११ आॅगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे. 

या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार मिलिंद फडके, दिलीप कदम, डॉ. अरविंद पंडित यांच्या हस्ते झाले. या वेळी अवनीचे आई-वडील प्रिया पंडित, अजित पंडित, प्राची सिद्दीकी, अभिजीत नेवे, पल्लवी नेवे, उषा पाटकर, अमिता पंडित, नेहा मंगळवेढेकर, सुचित्रा भावे आदी उपस्थित होते. 


अवनीने पेन्सिल, ऑईल पेस्टल्स, वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर या माध्यमांचा वापर करून ३५ हून अधिक चित्रे साकारली आहेत. त्याशिवाय डब्याचे झाकण, स्पंज, भाज्या, पाने अशा विविध गोष्टींचे ठसे, धावदोरा, रंगीत कागद यांचा वापर करून काही चित्रे साकारली आहेत. ही सगळी चित्रे नजर खिळवून ठेवत आहेत.  

‘अवनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून चित्र काढायला लागली. मी फाईन आर्टस् केलेले असल्याने माझे काम सुरू असताना ती बघायची. मलाही कागद, पेन्सिल, रंग दे असे सांगायची. मी करते, असे तिचे प्रत्येक गोष्टीत असायचे. प्रत्येक गोष्ट करून बघण्याचा तिचा उत्साह दांडगा असायचा. मीही तिला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्यातूनच तिचा हा छंद वाढत गेला आणि आज वयाच्या पाचव्या वर्षी तिचे स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे, ही खूप आनंदाची बाब आहे,’ अशा शब्दात  अवनीच्या आई प्रिया पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dilip Neve About 72 Days ago
Marvellous
0
0
Anita Neve About 72 Days ago
Excellent 👌👌
0
0

Select Language
Share Link
 
Search