Next
कार्यकर्त्यांसाठी बैठकीचे आयोजन
BOI
Friday, June 09, 2017 | 12:54 PM
15 0 0
Share this article:

कार्यकर्त्यांसाठी बैठकीचे आयोजनशिरूर (पुणे) : तालुक्यातील अनंतपाळ येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युवा मेळाव्याची पूर्वतयारी करणे हा या बैठकीचा उद्देश होता. म्हणून प्रदेश चिटणीस राहुल केंद्रे आणि जिल्हाध्यक्ष अजित माने यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या बैठकीत बोलताना राहुल केंद्रे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय संघटन सप्ताहाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे पक्षात संघटन मजबूत करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.’

या मेळाव्याला पालकमंत्री संभाजीराव पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, सरचिटणीस आमदार संतोष दानवे उपस्थित राहणार आहेत. ‘या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ’असे आवाहन राहुल केंद्रे आणि अजित माने यांनी केले आहे.

या वेळी विद्यार्थी जिल्हाप्रमुख पंकज रक्षाळे, तालुकाध्यक्ष प्रकाश कोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोशल मीडिया प्रमुख गिरीश पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संतोष डोंगरे, नगरपंचायत बांधकाम सभापती गणेश धुमाळे, गणेश मोहिते, महेश भिंगोले, अक्षय पाटील, सचिन सांगवे, ओंकार शिवणे, अविनाश कुलकर्णी, राजन सावंत उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search