Next
‘लेखापालांनी कौशल्य व नवतंत्र आत्मसात करावे’
सीए यशोधन काळे यांचे मत
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 12:38 PM
15 0 0
Share this article:

महिला लेखापालांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी (मध्यभागी) यशोधन काळे, प्रफुल्ल छाजेड, एस. बी. झावरे, सीए सर्वेश जोशी, एस. जी. मुंदडा, आनंद जाखोटिया, अमोद भाटे, ऋता चितळे, रेखा धामणकर, प्राजक्ता चिंचोळकर यांच्यासह इतर मान्यवर.

पुणे : ‘काळाप्रमाणे सनदी लेखापालांनी (सीए) विकसित ज्ञान, कौशल्य आणि नवतंत्र आत्मसात करायला हवेत. भविष्यात कृत्रिम बुद्धिमतेमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत. २०३० पर्यंत बरीच क्षेत्रे स्वयंचलित होतील. त्यात आपले अस्तित्व कायम राहण्यासाठी नीतिमूल्ये, नवीन तंत्रज्ञान, माहिती, सुरक्षितता जपायला हवी. याशिवाय यांत्रिकरणामुळे स्त्री-पुरुष समानताही वाढेल. त्यामुळे महिला आणि पुरुष लेखापाल असे वर्गीकरण करावे लागणार नाही’, असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाचे (आयसीसीआय) माजी अध्यक्ष सीए यशोधन काळे यांनी केले.

यशोधन काळे यांचा सत्कार करताना आनंद जाखोटिया. या वेळी व्यासपीठावर एस. बी. झावरे, काळे, प्रफुल्ल छाजेड, एस. जी. मुंदडा.
आयसीसीआय पुणे व पिंपरी-चिंचवड विभाग आणि कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेम्बर्स इन प्रॅक्टिस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सनदी लेखापालांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी यशोधन काळे बोलत होते. या वेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड, केंद्रीय समिती सदस्य सीए तरुण घिया, सीए एस. बी. झावरे, विभागीय समिती सदस्य सीए सर्वेश जोशी, सीए एस. जी. मुंदडा, आयसीएआय पुणे विभागाचे चेअरमन सीए आनंद जाखोटिया, पिंपरी-चिंचवड विभागाचे चेअरमन अमोद भाटे, परिषदेच्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, सीए रेखा धामणकर, सीए प्राजक्ता चिंचोळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत दोनशेपेक्षा अधिक महिला सीएंनी सहभाग नोंदवला.

यशोधन काळे म्हणाले, ‘महिला मल्टिटास्किंग असतात. एकाचवेळी त्या घर, कुटुंब, मुले आणि नोकरी-व्यवसाय सांभाळतात. त्यांच्याकडे वेळेचे उत्तम नियोजन, कामातील प्रामाणिकता, संवेदनशीलता असे अनेक गुण असतात. परंतु, त्यांना अनेकदा परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली पुढे येऊ दिले जात नाही. त्यांना योग्य संधी मिळाली, तर त्या खूप चांगले काम उभारू शकतात. ‘वर्क फ्रॉम होम’, ‘वर्क रिमोर्टली’ या संकल्पना रुजत आहेत. त्यामुळे तशा प्रकारचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करून महिलांनी आपल्यातील क्षमता विकसित कराव्यात.’

प्रफुल्ल छाजेड म्हणाले, ‘महिला सीएंनी वेगवेगळ्या परिषदांमध्ये सहभागी व्हावे. ज्यातून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यक्तिमत्व प्रसारासाठी मदत होते. एकमेकांना सहकार्याच्या भूमिकेतून आपण काम केले पाहिजे. ज्ञानाचे आदानप्रदान होणे हे गरजेचे आहे. ‘उद्या कसे होईल’ यापेक्षा आज मी काय करू शकते, याचा विचार केला पाहिजे.’

आनंद जाखोटिया म्हणाले, ‘आयसीएआय पुणेच्या माध्यमातून सीए अधिक सक्षम व अद्ययावत होण्यासाठी विविध उपक्रम आणि राष्ट्रीय परिषदा घेतल्या जात आहेत. पुणे शाखेच्या पुढाकारातून होणारी ही चौथी राष्ट्रीय परिषद असून, यापूर्वी जून महिन्यात शिर्डी येथे पाचशे सीएंसाठी, पुणे येथे आठशे सीएंसाठी आणि शेगाव येथे आठशे सीएंसाठी परिषद झाली.’

ऋता चितळे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली; तसेच दोन दिवसांच्या परिषदेत होणाऱ्या सत्रांविषयी माहिती दिली. एस. बी. झावरे, सर्वेश जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रिया आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता चिंचोळकर यांनी आभार मानले.

महिला लेखापाल परिषदेत सहभागी सीए यशोधन काळे, अमोद भाटे, ऋता चितळे, रेखा धामणकर, प्राजक्ता चिंचोळकर यांच्यासह इतर मान्यवर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search