Next
आंतरशालेय नाट्य स्पर्धेत डॉ. कलमाडी हायस्कूलला विजेतेपद
प्रेस रिलीज
Friday, January 25, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

‘मॅकबेथ’ नाटकातील एक क्षण

पुणे : औंध येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘पुणे शेक्सपीअर स्लॅम २०१९- द बॅटल ऑफ द बार्ड’ या आंतरशालेय नाट्यस्पर्धेत विजेतेपदाचा मानाचा चषक पटकावला आहे. ‘हेलेन ओ ग्रेडी इंटरनॅशनल’ संस्थेच्या ‘दी एज्यु ड्रामा अॅकॅडमी’तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील १० शाळांनी या स्पर्धेत भाग घेऊन शेक्सपीअरची विविध नाटके सादर केली. त्यात डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या संघाने ‘मॅकबेथ’ हे नाटक सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. करिष्मा शर्मा हिने या विद्यार्थिनीने नाटकाचे दिग्दर्शन केले होते. या स्पर्धेत शाळेने ‘चँपिअन्स ट्रॉफी’ तर पटकावलीच, शिवाय नाटकात ‘मॅकबेथ’ ही व्यक्तिरेखा साकारणारा विद्यार्थी यू. बी. अनिरुद्ध या विद्यार्थ्याने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक पटकावले. ‘हेलेन ओ ग्रेडी इंटरनॅशनल एज्यूड्रामा’चे (पश्चिम बंगाल) प्रादेशिक व्यवस्थापक डंकन राइस यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्याच हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search