Next
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र
BOI
Friday, June 07, 2019 | 10:45 AM
15 0 0
Share this article:

लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात. पण, गुंतवणूक आणि बचत यात फरक असल्याचे देवदत्त धनोरकर म्हणतात. याबाबतच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट करीत त्यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’मधून म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट कसे साध्य करावे, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. 

गुंतवणुकीचे महत्त्व, जोखीम, गुंतवणूक करण्यापूर्वी घ्यायची दक्षता, परतावा आदी संकल्पना समजून दिल्यावर म्युच्युअल फंडाबाबतचे समाज, गैरसमज आणि वस्तुस्थिती विशद केली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक न करण्याची मानसिकता व कारणे, म्युच्युअल फंड गुंतवणूक का करावी, त्यासाठी सर्वांत योग्य वेळ, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील आर्थिक नियोजन व म्युच्युअल फंड गुंतवणुकीची उपयुक्तता, योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड, म्युच्युअल फंड म्हणजे काय, मंथली इन्कम प्लॅन, बॅलन्स फंड, इक्विटी फंड, करबचत योजना आदींची उपयुक्त माहिती यात आहे. विविध गटांसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट व म्युच्युअल फंड आदी सर्व माहिती देत गुंतवणुकीचा गुरुमंत्र दिला आहे.    

पुस्तक : म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र
लेखक : देवदत्त धनोरकर 
प्रकाशक : देवदत्त धनोरकर 
पाने : १४४ 
किंमत : १९९ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search