Next
मुर्तवडे गंधकुटी बुद्ध विहारात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव
मिलिंद जाधव
Saturday, May 11, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:


चिपळूण : तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महोत्सव १७ व १८ मे २०१९ रोजी तालुक्यातील मुर्तवडे बौद्धवाडी येथील गंधकुटी बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती (नोंदणीकृत) अंतर्गत २७ गाव विभाग शिरवली गट क्रमांक सहा व बौद्ध विकास संस्था मुर्तवडे व माता रमाई आदर्श महिला मंडळ (मुंबई/स्थानिक) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. 

मुर्तवडेतील बौद्ध विकास संस्थेमार्फत मुंबई व ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. दर वर्षी विविध क्षेत्रांत कार्यरत मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा जयंती महोत्सव साजरा केला जातो. या वर्षी १७ व १८ मे रोजी हा महोत्सव घेण्यात येणार असून, यानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. 

१७ मे रोजी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मार्गदर्शक, प्रमुख वक्ते व मान्यवरांचा सत्कार सोहळा, जाहीर सभा व रात्री नऊ वाजता पनवेलमधील (मुंबई) कवी-गायक गणेश पवार आणि सहकाऱ्यांचा करमणुकीचा कार्यक्रम सादर केला जाईल. १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत जेष्ठ प्रवक्ते व सिद्धार्थ विद्यालयातील प्रा. विजय मोहिते  धम्मप्रवचन करणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतील. सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणूक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व रात्री नऊ वाजता मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील. 

या कार्यक्रमादरम्यान संस्थेतर्फे मुर्तवडे- कातळवाडीचे सुपुत्र दीपक कारकर (समाजसेवक/पत्रकार) यांना मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्य गौरव पुरस्कार २०१९ प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बौद्ध विकास संस्था व माता रमाई आदर्श महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search