Next
एस्सार विझाग टर्मिनलचे आधुनिकीकरण
प्रेस रिलीज
Wednesday, December 13 | 04:28 PM
15 0 0
Share this story

विशाखापट्टणम / मुंबई : ‘एस्सार विझाग टर्मिनल लि.’ने (ईव्हीटीएल) आठ हजार टीपीएच (टन्स प्रति तास) शिप लोडर बसवून त्याचे कामकाज सुरू करण्यासाठी एकंदर सुविधा आठवडाभर बंद राहाणार असल्याचे ११ डिसेंबर रोजी जाहीर केले. हा शिप लोडर कंपनीच्या विझाग टर्मिनलची (बाहेरील हार्बर) लोखंड हाताळणी सुविधा अद्यावत करण्याच्या ८३० कोटी रुपयांच्या विस्तार योजनेचा भाग आहे. यामुळे या हाताळणी सुविधेची क्षमता १२.५ एमटीपीएवरून २३ एमटीपीएवर जाणार आहे.

सुविधा बंद राहाण्याच्या काळात (१३ ते १९ डिसेंबर २०१७) नव्या रिक्लेम आणि मेकॅनिकल कन्व्हेयर यंत्रणेसह इतर कार्गो हाताळणी उपकरण यांचेही काम सुरू केले जाणार आहे. या घडामोडींनंतर ईव्हीटीएलतर्फे एक लाख वीस हजार टीपीडी (टन्स प्रति दिन) कार्गो हाताळणी दर साध्य केला जाणार असून, त्यामुळे काम पूर्ण करण्याचा कालावधी कमी होईल; तसेच पूर्व किनाऱ्यावरील निर्यातदारांसाठी वाहतूक खर्च स्पर्धात्मक राहील.
ईव्हीटीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एच. सत्यानंद म्हणाले, “सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय नियोजनपूर्व असून, त्यामुळे निर्यातदारांच्या शिपमेंट्समध्ये कोणताही अडथळा येणार नाही. आम्ही ४१ वर्ष जुन्या शिप लोडरऐवजी नवा लोडर बसवणार असल्यामुळे त्याच्या कामाचा वेग अर्थातच लक्षणीय असेल.”

एस्सार विझाग टर्मिनल्स लिमिटेडने (ईव्हीटीएएल) मे २०१६मध्ये डिझाइन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर (डीबीएफओटी) आधारित विझाग पोर्ट विस्तार प्रकल्प ३० वर्षांसाठी हाती घेतला आहे. तेव्हापासून कंपनीने टर्मिनलची लोखंड हाताळणी क्षमता २५ हजार टीपीडीवरून ७० हजार टीपीडीवर नेली आहे. प्रकल्प आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर लोडिंग क्षमता एक लाख वीस हजार टीपीडीवर जाईल, शिवाय हे सुविधा केंद्र बाह्य बंदरावरील १८ मीटर ड्राफ्ट आणि दोन लाख एमटीपर्यंतच्या व्हेसल्ससाठी जागा देऊ शकेल.

एस्सार पोर्टबद्दल :
द्रव, कोरडे बल्क, ब्रेक बल्क आणि जनरल कार्गो हाताळणीसाठी पोर्ट व टर्मिनल विकसित व कार्यान्वित करून देणे, ही एस्सार पोर्टची खासियत आहे. क्षमता आणि थ्रुपुटच्या बाबतीत ही भारताच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे भारतात चार टर्मिनल कार्यरत असून ते पश्चिम किनाऱ्यावरील हजिझा, सलाया (दोन्ही गुजरातमध्ये) आणि पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणम व पॅरादीप येथे आहेत. भारताची पोर्ट टर्मिनल्सची सध्याची कार्यान्वित क्षमता ८२ एमटीपीए असून ती २०१७ - १८ पर्यंत एकशे दहा एमटीपीए होईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link