Next
‘रोडकास्ट’ची निधी उभारणी
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील प्रमुख तंत्रज्ञान आधारित मालमत्ता निरीक्षण, फ्लीट व्यवस्थापन आणि वाहन ट्रॅकिंग मंच ‘रोडकास्ट’ने अलीकडेच आपल्या एंजल निधीची फेरी पूर्ण केली. निधीच्या या फेरीमध्ये ‘युएई’च्या ‘एचएनआय’चा सहभाग होता. या फेरीतून ‘रोडकास्ट’ने २५० हजार डॉलरची निधी उभारणी केली. या निधीचा वापर भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘रोडकास्ट’ संचालनाच्या विस्तारासाठी करणार आहे. यात प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराचा प्रयत्न असणार आहे.

फ्लीट व्यवस्थापन आणि मालमत्ता ट्रॅकिंग उद्योगात ‘रोडकास्ट’ने आपली छाप उमटवली आहे. अलीकडेच या कंपनीने दिल्लीतील पोलिस दलाच्या हालचालींचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि दलाची वाहने अत्याधुनिक संचार आणि ट्रॅकिंग उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी दिल्ली पोलिस विभागाशी हातमिळवणी केली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे कंपनीला संशोधन आणि विकास, उत्पादन संरचना, पीआर आणि जाहिरात संचालन वगैरे बाबतीत प्रोत्साहन मिळाले आहे; तसेच कंपनीचे सदस्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यास देखील याने मदत होणार आहे.

‘रोडकास्ट’चे सहसंस्थापक राहुल मेहरा म्हणाले, ‘एक तंत्रज्ञान कंपनी या नात्याने आम्ही फक्त उत्पादनाची निर्मिती करण्याऐवजी त्या तंत्रज्ञानाच्या भोवतालची विविध उपाय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे आम्ही प्रस्तुत केलेल्या उत्पादनाला उच्च मापनीयता मिळाली आहे व त्याचवेळी आमच्या ग्राहकांच्या वैयक्तिक गरजांनुरूप आमच्या सेवांमध्ये फेरबदल करण्याच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. ‘रोडकास्ट’च्या सतत नाविन्यपूर्णतेवर भर देण्याबरोबर प्रस्तुत केलेल्या ऑन-रोड मालमत्ता व्यवस्थापन उपायांमुळे एंजल निधीची फेरी यशस्वी होण्यास हातभार लागला.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link