Next
शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन
‘ओन मीडिया’तर्फे आयोजन
मिलिंद जाधव
Monday, June 17, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

छत्रपती शाहू महाराजठाणे : ओन मीडिया या संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त (२६ जून) ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ‘राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर, परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेचे स्वीकारलेले व्रत मी कदापी सोडणार नाही,’ असे ठणकावून सांगणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची महती, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याची संधी मिळणार आहे. 

या स्पर्धेत शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित निबंध,  पोवाडा, गाणे, कविता, त्यांनी केलेल्या कार्याचा  आढावा घेणारा व्हिडिओ (यात स्वतः बोलून दाखवणे), त्यांचे रेखाटलेले चित्र, नाटक, रांगोळी २४ जून २०१९पर्यंत ई-मेलवर पाठवायचे आहे. त्यातील सर्वांत उत्तम प्रथम तीन सादरीकरणाला शॉपिंग व्हाउचर स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक तीन हजार रुपयांचे व्हाउचर, द्वितीय पारितोषिक दोन हजार, तृतीय पारितोषिक एक हजार रुपयांचे, चार उत्तेजनार्थ क्रमांकांना ५०० रुपयांचे व्हाउचर दिले जाणार आहे. 

स्पर्धेसाठी भाषेचे बंधन नसून, सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार असून, स्पर्धेसाठी  वयाची कोणतीही अट नाही; तसेच स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. निकाल २६ जूनला दुपारी १२ वाजता  कळविला जाईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. 

‘सध्या युवकांमध्ये सोशल मीडियाचे वारे वाहत आहे. म्हणून  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांची गौरवगाथा, त्यांचे विचार सांस्कृतिक चळवळीतून पुढे नेण्यासाठी आम्ही विविध स्पर्धेतून अभिवादन करत आहोत,’ असे ‘ओन मीडिया’ टीमने सांगितले.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 
मिलिंद जाधव : ८६५५५ ६९४३६
राष्ट्रपाल काकडे : ८५५१० ३३९५५ 
ई-मेल : ownmediatalent@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search