Next
सिंहगडावर साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा
विराट दूचाकी रॅलीचे आयोजन
BOI
Saturday, June 15, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील विश्व हिंदू परिषद पुरस्कृत ‘श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती’ (किल्ले सिंहगड)च्या वतीने रविवारी (१६ जून) सकाळी १० वाजता किल्ले सिंहगड येथे शिवराज्याभिषेकदिन तिथीनुसार भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी इतिहास अभ्यासक मोहन शेटे व अभिनेते प्रविण तरडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव सिंहगडावर साजरा होणार आहे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १६जूनला सकाळी १० वाजता गडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वेळी तब्बल दोन हजारांवर शिवभक्तांची उपस्थिती असणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. 

दुचाकी रॅली, पालखी, मिरवणूक, अभिषेक आणि व्याख्यान अशा विविधरंगी कार्यक्रमांचा या सोहळ्यात समावेश असेल. ‘सरदार पिलाजीराव जाधवराव’ यांचे वंशज समीर जाधवराव यांची या वेळी विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय इतिहास अभ्यासक मोहन शेटे आणि मराठी अभिनेते प्रविण तरडे हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search