Next
उन्हाळी सुट्टीत करता येणार ‘कलारी किड्स’सोबत धमाल
‘पोगो’ वाहिनीवरील नवीन शोची मुलांमध्ये वाढती उत्सुकता
BOI
Friday, April 05, 2019 | 01:29 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : उन्हाळी सुट्टीत मुलांना काहीतरी नवीन पाहायला मिळावे, यासाठी सर्वच कार्टून्स वाहिन्यांची धडपड असते. असाच एक ‘कलारी किड्स’ नावाचा धमाल शो पोगो वाहिनी छोट्या मित्रांसाठी घेऊन येत आहे. प्राचीन मार्शल आर्ट ‘कल्लरीपयट्टू’ शिकण्यापासून ते कलारीपुरमच्या जादुई जंगलात राहण्याचा थरार अनुभवणारे हे कलारी किड्स मुलांना नक्कीच आवडतील, असे पोगो वाहिनीने म्हटले आहे. 

जादू आणि रहस्यांनी भरलेले एक घनदाट जंगल, चित्तथरारक स्टंट, हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि चित्ताकर्षक साहसी खेळ हे सगळेच यात असणार आहे. येत्या १५ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी पाच वाजता हा शो प्रदर्शित केला जाणार आहे. जुन्या काळातील वैभव आणि भारतातील प्रेमाची ऊब त्याचबरोबर नव्या युगाची सौम्यता आणि आनंदाने हा शो सजला आहे. 

या कूल किड्सना गुरू पालन आणि गुरू वेता या दोन गुरूंकडून शिक्षण मिळणार आहे. गुरू  पालनच्या संघात असलेले बीनू, मीना, श्याम, उन्नी आणि अमी आणि गुरू वेताच्या संघातील राका, धाना, मणी, लेखा, लंगोट आणि मॉन्स्टर यांच्यात नेहमीच चढाओढ सुरू असते. मुलांचे वय आणि निरागसता लक्षात घेऊन गुरू पालन साध्या सोप्या पद्धतीने आपल्या शिष्यांतील गुण विकसित करण्याच्या प्रयत्नात असतात, तर गुरू वेतांचा राकट मिलिटरी प्रकारच्या प्रशिक्षणावर विश्वास आहे. त्यांच्या प्रशिक्षण व कलरीपयट्टूनंतर मुले आपल्या सामान्य आयुष्यात परत जातात आणि एकमेकांच्या खोड्या काढत आनंदात राहतात.

या कार्यक्रमाचे दृश्य दिग्दर्शन हे भारतीय पारंपरिक चित्रांतील सौंदर्य दाखवण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. दमदार पॅनलिंग आणि हाय कॉन्ट्रास्ट स्टाइलमुळे तरुण चाहत्यांना एक उत्तम अनुभव मिळेल. भारतीय शास्रीय संगीत आणि आधुनिक संगीताचा मेळ घातलेले व आकर्षक चालीचे  आनंदाने भरलेले ‘कलारी थीम साँग’, हे नक्कीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिद्धार्थ जैनपोगो वाहिनीवरील या कार्यक्रमाबद्दल ‘टर्नर ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ जैन म्हणाले, ‘मुलांना आवडेल असे कार्यक्रम देण्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू असतो, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांशी आमचे दृढ नाते निर्माण व्हावे. त्याचबरोबर देशातच तयार झालेल्या आणि स्थानिक कार्यक्रमांनी पोगोच्या कार्यक्रमांच्या नीतीमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला विश्वास आहे की ‘कलारी किड्स’मुळे आमच्या छोट्या दोस्तांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ होईल.’

या कार्यक्रमाबाबतची उत्सुकता वाढवण्यासाठी आणखीही बरेच काही कार्यक्रम पोगो वाहिनीतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत. लहान मुले मुंबईच्या मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये असलेल्या एका ‘ऑगमेंटेड रीअॅलिटी बूथ’मध्ये कलारी किड्सच्या दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकणार आहेत. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी मुलांना हा आनंद लुटता येणार आहे.
 
त्याचबरोबर या मे महिन्यात मुलांचा सुपरहिरो भीमही अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घेऊन येत असून कलारी किड्सच्या दुनियेची देशभरात विविध ठिकाणी ओळख करून देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. टीव्हीवरून घेतल्या जाणाऱ्या एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टूनना भेटण्याची तसेच कलारी किड्ससोबत भीमचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ‘ग्रीन गोल्ड अनिमेशन’ने तयार केलेला हा कार्यक्रम चाहत्यांसाठी पोगोवर तमिळ, हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

(To read this news in English, please click here.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search