Next
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीसपदी गिरीश गुरनानी
BOI
Wednesday, September 18, 2019 | 02:15 PM
15 0 0
Share this article:

गिरीश गुरनानीपुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीसपदी गिरीश गुरनानी यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे-पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे यांच्या उपस्थितीत १७ सप्टेंबर रोजी गुरनानी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

गिरीश गुरनानी हे अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. धडाडीचे नेते, कुशल संघटक आणि सेवाव्रती असलेले गुरनानी ट्रस्टच्या माध्यमातून पारंपरिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. सामाजिक कामाच्या माध्यमातूनही ते योगदान देतात. अंध शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करणे, प्रजासत्ताकदिनी खाऊवाटप असे उपक्रम ते राबवितात. समाजासाठी काही तरी सातत्याने करत राहायचे हे त्यांचे ध्येय आहे. ट्रस्टच्या माध्यमातून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम गुरनानी करतील. पक्षाची ध्येयधोरणे, स्वाभिमानी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात, तसेच पक्ष संघटन वाढविण्यात गिरीश गुरनानी नक्की यशस्वी होतील अशी आशा आहे,’ असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरचे शहराध्यक्ष चेतन तुपे-पाटील यांनी गुरनानी यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search