Next
मुन्शी प्रेमचंद, दामोदर धर्मानंद कोसंबी
BOI
Tuesday, July 31 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘उपन्यास सम्राट’ मुन्शी प्रेमचंद आणि व्यासंगी संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा ३१ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
मुन्शी प्रेमचंद 

३१ जुलै १८८० रोजी वाराणसीमध्ये जन्मलेले धनपतराय ऊर्फ मुन्शी प्रेमचंद हे आधुनिक हिंदी आणि उर्दू साहित्यातले ‘उपन्यास सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे लेखक! हिंदी साहित्यात कथा आणि कादंबरी लेखनात त्यांनी क्रांतिकारी प्रवाह आणले. ज्येष्ठ बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांना ‘उपन्यास सम्राट’ हा किताब दिला. ‘लेखणीचा शिपाई’ असेही त्यांना ओळखले जाई. १९१०मध्ये त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जुलूम आणि भारतीयांची गुलामगिरी यावर लिहिलेली ‘सोजे वतन’ ही कादंबरी इंग्रजांनी जप्त केली आणि त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी प्रेमचंद नावाने लेखन सुरू केले. भारतीय समाजजीवनाचे यथार्थ चित्रण त्यांच्या कादंबऱ्यामधून घडते. ‘गोदान’ या त्यांच्या कादंबरीने हिंदी साहित्यात इतिहास घडवला. १९२१पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर नोकरी करीत होते. त्यानंतर ते बनारसला परतले आणि त्यांनी आपली लेखणी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता चालवण्याचे ठरविले. १९२३मध्ये त्यांनी ‘सरस्वती प्रेस’ची स्थापना केली. १९१३ ते १९३१ या कालावधीत त्यांनी २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. ‘मंगलसूत्र’ ही त्यांची शेवटची कादंबरी मात्र अपूर्ण राहिली. आठ ऑक्टोबर १९३६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.  
......

दामोदर धर्मानंद कोसंबी 

३१ जुलै १९०७ रोजी जन्मलेले दामोदर धर्मानंद कोसंबी हे गणितज्ञ, इतिहास संशोधक, तसेच इंग्रजी, खगोलशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक विषयांचे अभ्यासक, व्यासंगी संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक होते. पुण्यात वास्तव्याला असलेल्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला. आपल्या ‘ॲन इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री’ या ग्रंथात त्यांनी भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तृहरीचा शिलालेख आणि अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. सिंधूची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत-रोमन व्यापार, आर्यांचा विस्तार, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती याविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले आणि मांडले. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारित घटना आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. २९ जून १९६६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

यांचाही आज जन्मदिन :
हॅरी पॉटर या बालनायकाबद्दलच्या सात कादंबऱ्या लिहून ब्रिटनच्या राणीपेक्षाही जास्त श्रीमंत झालेली जे. के. रॉलिंग (जन्म : ३१ जुलै १९६५)
इतिहासकार आणि संतांचे चरित्रकार ल. रा. पांगारकर (जन्म : ३१ जुलै १८७२, मृत्यू : १० नोव्हेंबर १९४१)
(यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link