Next
‘एसबीएलपी’द्वारे १५ लाख महिलांना पाठिंबा
प्रेस रिलीज
Tuesday, September 04 | 04:38 PM
15 0 0
Share this story

पुणे : आयसीआयसीआय बँक लि.ने ‘सेल्फ हेल्प ग्रुप-बँक लिंकेज प्रोग्रॅम’द्वारे (एसबीएलपी) १५ लाख महिला लाभार्थींना पाठिंबा देण्याचा मैलाचा टप्पा ओलांडला असल्याचे जाहीर केले. स्वयंपूर्ण बनण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना सबल करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाचा भर औपचारिक बँकिंग सुविधा उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातील लोकांना वित्तीय सेवा व उत्पादने देण्यावर आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून, बँकेने २०११मध्ये सुरुवात झाल्यापासून, १.२३ लाखांहून अधिक एसएचजींना अंदाजे एक हजार ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे आणि त्यामुळे एसएचजींना कर्ज देणारी ही राज्यातील सर्वात मोठी खासगी कर्जदाती संस्था ठरली आहे.

यानिमित्त बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे सीनिअर जनरल मॅनेजर आणि ग्रामीण व सर्वसमावेशक बँकिंग समूहाचे प्रमुख अविजित साहा म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेच्या मते, घरातील स्त्री हा घराचा कणा असतो. महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण व निम-शहरी भागांत राहणाऱ्या महिलांमध्ये उद्योजकतेचे गुण असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने, बँकेने आर्थिक सहाय्य दिल्यास या महिलांना देशाच्या आर्थिक विकासामध्ये सक्रिय सहभागी होता येईल आणि आर्थिक सुरक्षितता साधता येईल, असे बँकेला वाटते. आम्ही रोजगारनिर्मिती करणाऱ्या उपक्रमांमध्ये मग ते शेतात असो वा शेताच्या बाहेर, ज्या संस्थेचे कार्यरत सहभागी आहेत, अशा एसएचजींना प्राधान्य देतो आणि याद्वारे त्यांना व्यवसायाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो.’

‘बँकेने एसएचजींबरोबरच्या आपल्या कार्याच्या माध्यमातून, आतापर्यंत राज्यातील अंदाजे १५ लाख महिला लाभार्थींना सेवा दिली आहे व एक हजार ७५० कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ग्राहकांना बँकेच्या शाखेत यावे लागण्याऐवजी, एसएचजींसाठी दारोदारी बँकिंग उपलब्ध करण्यामध्ये बँक प्रवर्तक ठरली आहे. यामुळे ग्राहकांना बँकेच्या जवळच्या शाखेत जाण्यासाठी प्रवास करावा लागत नसल्याने त्यांना व्यवहार करण्यासाठी येणारा खर्च कमी झाला आहे. आर्थिक वर्ष २०२०च्या अखेरीपर्यंत, बँकेने राज्यातील अंदाजे २०  लाख महिला लाभार्थींपर्यंत विस्तार करायचे आणि एकूण दोन हजार ३०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करायचे ठरवले आहे,’ असे साहा यांनी सांगितले.

बँकेच्या यशाची दखल घेत, स्वयंपूर्ण व समाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांचा विकास करून ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या हेतूने, बँकेला महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र स्टेट रुरल लाइव्हलीहूड मिशनतर्फे ‘खासगी क्षेत्रातील व्यावसायिक बँकां’मध्ये पहिले बक्षीस देण्यात आले आहे.

प्रामुख्याने ग्रामीण व निम-शहरी भागांतील वंचित महिलांच्या १०-२० जणींच्या समूहाला सेल्फ हेल्प ग्रुप (एसएचजी) असे म्हटले जाते. या महिला विशिष्ट कालावधीने पैसे जमा करतात व या पैशांचा उपयोग कृषी व संबंधित उपक्रम, उदबत्तींची निर्मिती, साड्या व टेक्स्टाइल निर्मिती, पापडासारख्या खाद्यपदार्थांचे उत्पादन, मंदिरांमध्ये खेळणी व फुलांची दुकाने, कृत्रिम दागिन्यांचे ट्रेडिंग, फळे व भाज्यांचे ट्रेडिंग असा उत्पन्न देणाऱ्या उपक्रमांसाठी केला जातो.

बँक विशिष्ट मनुष्यबळाच्या मदतीने एसएचजींना दारोदारी सेवा देते व यामुळे एसएचजीच्या सदस्यांना बँकेच्या शाखेत जावे लागत नाही. बँकेचे प्रतिनिधी कर्जाचा अर्ज आणि एसएचजीचा तपशील बँकेकडे सादर करतात. त्यासाठी टॅब्लेटचा वापर करून डिजिटल पद्धत, पेपरलेस प्रक्रिया अवलंबली जाते व त्यामुळे बँकेकडून दिल्या जाणारा वेळ लक्षणीय वाचतो. या सेवेमुळे ग्राहकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेच्या नजिकच्या शाखेत जावे लागत नसल्याने त्यांचा व्यवहारांसाठी येणारा खर्चही वाचतो.   

बँक महाराष्ट्रातील सर्व ३५ जिल्ह्यांतील एसएचजींना कर्जे देते. बँक राज्यातील ७१० शाखा व २ हजार ८०० हून अधिक एटीएम या रिटेल जाळ्यामार्फत ग्राहकांना सेवा देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link