Next
मार्गारेट वाईस
BOI
Friday, March 16, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

क्रीन्न नावाची अद्भुत दुनिया, तिथली जंगलं, डोंगर, स्फटिकमनोरे, गुंतागुंतीची रचना असलेला चक्रव्युहात्मक भुलभुलैय्या, चित्रविचित्र प्राणी आणि ड्रॅगन्स यांवर आधारित उत्कंठावर्धक कादंबऱ्या लिहिणाऱ्या मार्गारेट वाईसचा १६ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्पपरिचय...
..... 
१६ मार्च १९४८ रोजी मिसुरीमध्ये जन्मलेली मार्गारेट वाईस ही अद्भुत आणि वैज्ञानिक कादंबऱ्या लिहिणारी लेखिका म्हणून ओळखली जाते. 

तिला अद्भुताचं आणि रहस्यमय जगताचं विलक्षण आकर्षण आणि तिच्या बहुतेक कादंबऱ्या अशाच विषयावर आधारित आहेत. तिने स्वतंत्र कादंबऱ्या लिहिल्याच पण ट्रेसी हिकमनबरोबर तिने निर्माण केलेली ड्रॅगनलान्स क्रॉनिकल्स ही तीस वर्षांपूर्वीची निर्मिती आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. ड्रॅगनच्या अद्भुत आणि चित्तथरारक कादंबऱ्यांवर आधारित गेम्ससुद्धा बच्चेकंपनीमध्ये भलतेच लोकप्रिय आहेत. 

अन्सलॉन, द ड्रॅगन आईल्स, इथीनकर्थिआ, टॅलॅडस आणि अॅडलॅटम अशा पाच खंडांमध्ये पसरलेली क्रीन्न नावाची अद्भुत दुनिया. तिथली जंगलं, डोंगर, स्फटिकमनोरे, गुंतागुंतीची रचना असलेला चक्रव्युहात्मक भुलभुलैय्या, चित्रविचित्र प्राणी आणि ड्रॅगन्स...हे सारं तिने विलक्षण ताकदीने मांडलंय. त्या सर्व कादंबऱ्यांचा खप सहजच अडीच कोटींवर गेलाय.

डार्कस्वोर्ड, रोझ ऑफ द प्रोहेट, स्टार ऑफ द गार्डीअन्स, द डेथगेट सायकल, ड्रॅगनशिप्स – असं तिचं इतर लेखन प्रसिद्ध आहे.

लीझ्झ ह्या आपल्या कन्येबरोबर तिने वॉरिअर एंजल आणि रिबेल एंजल अशा दोन अतींद्रिय विश्वावर आधारित कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्याही चांगल्याच लोकप्रिय आहेत. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link