Next
ब्रुनो ट्रॅव्हन, विश्वनाथ शेट्ये
BOI
Thursday, May 03 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘दी ट्रेझर ऑफ दी सिएरा मॅड्र’ या आपल्या कादंबरीने जगभर तुफान लोकप्रियता मिळवलेला लेखक ब्रुनो ट्रॅव्हन (टोपण नाव) आणि नाटककार विश्वनाथ शेट्ये यांचा तीन मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
ब्रुनो ट्रॅव्हन 

तीन मे १८९० रोजी जन्मलेल्या एका जर्मन कथा-कादंबरीकाराचं ब्रुनो ट्रॅव्हन हे खरं तर टोपणनाव, जो जगासाठी खरंच एक गूढ होऊन बसला आहे. इतका, की तो नक्की कुठे जन्मला, कोणत्या देशाचा नागरिक होता आणि त्याची जन्मतारीख तरी नक्की ‘तीन मे’च आहे का, अशा अनेक गोष्टींबद्दल आजही कुतूहल आहे. 

पुढे मेक्सिकोचं नागरिकत्व पत्करलेल्या, ट्रॅव्हनने १२ कादंबऱ्यांव्यतिरिक्त अनेक कथा लिहिल्या. त्याच्या जंगलकथा गाजल्या. त्याचं लेखन ३० भाषांमध्ये पोहोचलं आणि त्याच्या पुस्तकांच्या अडीच कोटींहून अधिक प्रतींचा खप झाला. 

त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, तो नक्की कोण होता याबद्दल अनेक प्रवाद आहेत. काही जणांच्या मते तो कैझर विल्हेम द्वितीय आणि एका अभिनेत्रीचा अनौरस पुत्र होता, तर काहींच्या मते तो नॉर्वेजिअन होता आणि ट्रॅव्हन टॉर्सव्हन हे त्याचं खरं नाव होतं. काहींच्या मते ऑट्टो फीज हे त्याचं खरं नाव; पण आता बहुतेकांनी मान्य केल्याप्रमाणे ‘रेट मारट’ हा जर्मन कलाकार म्हणजेच ब्रुनो ट्रॅव्हन असं मानतात! तसं पाहिलं, तर आर्नल्ड, बार्कर, विनेक, झीगेलब्रेनर अशीही अनेक नावं त्याच्याशी जोडली गेली आहेत. गंमत म्हणजे सिनेमांसाठी पटकथा लिहिताना तो ‘हाल क्रोव्ह' हे नाव वापरत असे. त्याच्या खऱ्या नावाचं गूढ म्हटलं तर कायमच आहे. 

दी डेथ शीप आणि दी ट्रेझर ऑफ दी सिएरा मॅड्र या त्याच्या कादंबऱ्या तुफान गाजल्या आणि लोकप्रिय झाल्या. ‘दी ट्रेझर ऑफ दी सिएरा मॅड्र’वर जॉन ह्युस्टनने हम्फ्री बोगार्टला घेऊन सिनेमाही काढला होता आणि त्याला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. 

दी जनरल फ्रॉम दी जंगल, रिबेलीअन ऑफ दी हॅन्ग्ड, दी ब्रिज इन दी जंगल, दी कॅरेट्टा, मार्च टू दी मोन्तारिया, अशी त्याची पुस्तकं गाजली होती. 

२६ मार्च १९६९ रोजी त्याचा मेक्सिकोमध्ये मृत्यू झाला.
.......

विश्वनाथ गोपाळ शेट्ये

तीन मे १८८६ रोजी जन्मलेले विश्वनाथ गोपाळ शेट्ये हे नाटककार म्हणून ओळखले जातात. 

लोकशासन, रक्षाबंधन, जुगारी, संगीत, रामरहीम, संगीत पंढरपूर, माझी जीवनस्मरणी, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१५ फेब्रुवारी १९६५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link