Next
‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांची चाफेकर बंधू स्मारकाला मानवंदना
प्रेस रिलीज
Saturday, June 23 | 11:01 AM
15 0 0
Share this story



पुणे : मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठ रस्त्यावरील क्रांतिकारक चाफेकर बंधूंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली आणि वंदे मातरम् म्हणत आदरांजली वाहिली. हा उपक्रम मॉडर्न अभियांत्रिकीच्या प्रेरणा क्लबने आयोजित केला होता.
 
२२ जून १८९८ या दिवशी इंग्रज प्लेग अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड नामक उन्मत नराधमाला ठार करून क्रांतीकारक चाफेकर बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यात प्लेगच्या नावाखाली चालवलेल्या जुलूम व अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. या वधासाठी तिनही चाफेकर बंधूंना व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शुक्रवारी (ता. २२) हा उपक्रम राबविण्यात आला.  

या कार्यक्रमासाठी प्रा. कौस्तुभ कापडणी, प्रा. विशाल येवलीकर, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित तापकीर, युवराज मोरे, चिन्मय दानी, कर्मचारी गणेश शेडगे व विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link