Next
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा टाटा समूहातर्फे सत्कार
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 12:05 PM
15 0 0
Share this article:पुणे : टाटा बिल्डिंग इंडिया शालेय निबंध स्पर्धा  २०१७-१८च्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू विभागांतील शहरस्तरीय विजेत्यांचा टाटा समूहातर्फे सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रेक्षागृहात २८ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला.

निबंध स्पर्धेचे हे १२वे वर्ष होते. या स्पर्धेसाठी यावर्षी ‘सत्तर वर्षांच्या भारतापुढे अनेक संधी व आव्हाने आहेत : ती कोणती आणि पुढील १० वर्षांत तुम्ही नवीन भारतासाठी कोणत्या पद्धतीने योगदान देऊ शकता?’ हा विषय होता. महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील सहा शहरांतील २१० इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या स्पर्धेच्या इंग्रजी विभागातून भाग घेतला. महाराष्ट्रातील १९ शहरांतील ६२५ शाळांनी मराठी विभागातून, तर चार शहरांतील ५० शाळांनी उर्दू विभागातून या स्पर्धेत भाग घेतला.

विजेत्यांना पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी डीन डॉ. सुधाकर जाधवर यांच्या उपस्थितीत चषक, पदके, भेटवस्तू आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search