Next
‘सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस’ कंपनी पुरस्काराने सन्मानित
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सुझलॉन एनर्जी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडला (एसजीएसएल) प्रतिष्ठित ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अॅवॉर्ड २०१८’मधील सर्व्हिसेस विभागात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्काराचे मूल्यांकन मापदंड अतिशय काटेकोर असून, ते युएसएच्या डेमिंग प्राइझ व माल्कम बाल्ड्रीज अॅवॉर्ड्सच्या मापदंडांप्रमाणे आहेत व यामध्ये कठोर व काटेकोर मूल्यांकन प्रक्रियेचे पालन केले जाते. यामध्ये व्यापक दृष्टिकोन तसेच कर्मचारी, व्यवस्थापन, ग्राहक, विक्रेता, सीएसआर व साईट्सवरील टीम्स या सर्व हितधारकांसोबतही संवाद साधला जातो. पुरस्कार प्रक्रिया साचेबद्ध व पारदर्शक असून, यात व्यक्तिगत मूल्यांकन, कंसेन्सस मिटींग्स व साइट व्हिजिट्स यांचा समावेश असतो.

‘एसजीएसएल’मार्फत भारतातील आठ राज्यांमध्ये आठ हजार ७००हून अधिक विंड टर्बाइन्स चालवली जातात. दीडशेडून अधिक साइट्सवर १२ गिगावॅटपेक्षा जास्त ऊर्जा उत्पादन केले जाते. दोन दशकांहून अधिक समृद्ध अनुभव गाठीशी असलेली ‘एसजीएसएल’ ही कंपनी सध्या अठराशेहून अधिक ग्राहकांसाठी ९७ टक्क्यांपेक्षा जास्त यंत्रांसह भारताच्या एकूण संस्थापित पवन ऊर्जा क्षमतेपैकी ३५ टक्के ऊर्जेचे व्यवस्थापन करते. ‘सुझलॉन’ने उत्कृष्ट इन-क्लास सुपरवायजरी कंट्रोल अँड डेटा अक्विजीशन (एससीएडीए) यंत्रणा विकसित केली आहे. प्रत्येक टर्बाइनमध्ये ३००पेक्षा जास्त सेन्सर्स २४x७ सर्व माहिती सुरक्षित नेटवर्कमार्फत ‘सुझलॉन’च्या मॉनिटरिंग सेंटरपर्यंत (एसएमसी) पोहोचवतात ज्याठिकाणी समस्या निवारण, घटनांमध्ये अपयश येण्याची शक्यतेचे अनुमान व समस्यांना थोपवण्यासाठी सतत देखरेख व आधुनिक पद्धतीने विश्लेषण केले जाते.  या शिवाय ‘एसजीएसएल’ने जुन्या फ्लीटच्या विश्वसनीयतेमध्ये सुधारणा करण्याबरोबरच वार्षिक ऊर्जा उत्पादनात अधिक वाढ करण्यासाठी वेगवेगळी मूल्यवर्धित उत्पादने व सेवा विकसित केल्या आहेत.   

बचावात्मक देखभालीचा (पीएम) प्रभाव वाढवण्यासाठी साइट टीम्सना मोबाइल सोल्युशन्स उपलब्ध करवून देण्यावर भर देण्यात आला आहे. एक मोबाइल अॅप टेक्निशियन्सना वास्तविक माहिती व प्रतिसाद मिळवण्यासाठी काम करत असताना सर्व पीएम चेकलिस्ट डेटा मिळवण्यासाठी सक्षम करते. हे अॅप त्यांना विंड फार्मच्या बचावात्मक देखभालीच्या घडामोडींची माहिती व विश्लेषण करण्यासाठी व्यापक अवलोकनाचा डॅशबोर्ड ठरते. यामुळे पीएम घडामोडींची गुणवत्ता व समयसूचकतेमध्ये सुधारणा झाली आहे. विशाल ग्रीड नेटवर्कच्या व्यवस्थापनावर सतत लक्ष देण्याबरोबरीनेच ‘एसजीएसएल’ने ग्राहकांसाठी संपूर्ण विंड पार्क सुविधेच्या एकंदरीत कामगिरीत सुधारणा घडवून आणली आहे.

या पुरस्काराबद्दल बोलताना ग्रुप सीईओ जे. पी. चलसानी म्हणाले, ‘सुझलॉनमध्ये आम्ही आमचे लक्ष उत्कृष्ट सेवेचे वचन पूर्ण करण्यावर, त्यासाठी गुणवत्तेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करण्यासाठी नवीनीकरण व सक्षम प्रक्रियांवर व आमच्या ग्राहकांसाठी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त लाभ सुनिश्चित करण्यावर केंद्रित करतो. सुट्या भागांची उपलब्धता, अभियंत्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ, सेवांचे डिजिटलायझेशन, सुरक्षेचे पालन व संचलनात चांगली कामगिरी या विविध मापदंडांबाबत ओएमएस डिव्हिजन सतत चांगली कामगिरी बजावत आहे.’

‘आम्ही १२ गिगावॅटपेक्षा जास्त संपत्ती व्यवस्थापन करणारी भारतातील संचालन व देखरेख व्यवसायातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी बनलो आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९७.४ टक्के जास्त अधिक यंत्रांची उपलब्धता व नऊ टक्के जास्त ऊर्जा उत्पादन केले आहे.  हा पुरस्कार आमच्या प्रयत्नांचे फलित आहे. दर्जेदार उत्पादने व सेवा प्रदान करण्यासाठी हितधारकांसोबत काम करत राहण्यासाठी आम्हाला यातून प्रेरणा मिळाली आहे,’ असे चलसानी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search