Next
‘शतदा प्रेम करावे’मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर
प्रेस रिलीज
Monday, April 16, 2018 | 05:08 PM
15 0 0
Share this story

अभिजित साटम आणि ज्ञानदा रामतीर्थकरमुंबई : स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्याऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावे लागेल.

अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवे नाते निर्माण होऊ लागले आहे; मात्र सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणाने या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. या मालिकेतून ज्ञानदाचे ‘स्टार प्रवाह’वर पदार्पण होत आहे.

सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, ‘या मालिकेची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे. ‘शतदा प्रेम करावे’चे टायटल साँग मला प्रचंड आवडले. ‘स्टार प्रवाह’बरोबर काम करायला मिळावे, अशी इच्छाही होतीच. ‘शतदा प्रेम करावे’च्या रूपाने ती पूर्ण होत आहे. यासाठी ‘स्टार प्रवाह’चे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार.’

उन्मेष आणि सायलीच्या नात्याचे पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे जाणून घेण्यासाठी पहा ‘शतदा प्रेम करावे’ सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’वर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link