Next
‘गुंतवणूकदार हेच महाराष्ट्राचे ॲम्बॅसिडर’
‘हरमन ऑटोमोटीव्ह इलेक्ट्रॉनिक्स’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 01:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘उद्योगपूरक धोरण राबविल्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आम्ही केवळ शासक नसून गुंतवणुकीदांरांचे भागीदार म्हणून काम करीत आहोत. गुंतवणूकदारांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असून, गुंतवणूकदार हेच महाराष्ट्राचे खरे ॲम्बॅसिडर आहेत,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यातील चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी येथे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या ‘हरमन’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन जून २०१९ रोजी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमिताभ कांत, हरमन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष दिनेश पालिवाल, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र हे देशाचे ऑटोमोबाइल हब आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात ॲटोमोबाइल क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. महाराष्ट्राने औद्योगिक फ्रेंडली धोरण स्वीकारल्यामुळे गुंतवणुकदारांचा मोठा ओढा महाराष्ट्राकडे आहे. राज्य सरकार हे केवळ शासक म्हणून नाही, तर भागीदार म्हणून हातात-हात घालून सर्वांसोबत काम करत आहे.’ 


गुंतवणुकदारांसमोरील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली असल्यामुळे गुंतवणुदारांचा मोठा विश्वास महाराष्ट्रावर आहे. गुंतवणुकदारांच्या प्रगतीसोबत महाराष्ट्राची प्रगतीही होत आहे. राज्यातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधीही झपाट्याने वाढल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अमिताभ कांत म्हणाले, ‘महाराष्ट्रात असलेल्या चांगल्या वातावरणामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. महाराष्ट्राच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे आणि सकारात्मक पुढाकाराने गुंतवणूक महाराष्ट्राकडे येत आहे. देशाच्या विकासाला ॲटोमोबाइल क्षेत्रामुळे गती मिळत आहे. प्रधानमंत्र्यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या यशस्वी धोरणामुळे हे शक्य झाले आहे.’ 


प्रास्ताविक करताना दिनेश पालिवाल म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पुणे एमआयडीसीत औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. पहिल्या टप्प्यानंतर २०२१पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरण होणार असून, उत्पादन क्षमता तीन पट करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्येही वाढ होणार आहे.’ 

‘हरमन’चे उपाध्यक्ष प्रताब दिव्यांगम यांनी आभार मानले. फडणवीस यांनी ‘हरमन’च्या उत्पादन युनिटला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search