Next
‘विद्यार्थ्यांना पसंतीचा विषय निवडता येणे महत्त्वाचे’
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘शिक्षणाचा उपयोग फक्त रोजगारकार्यक्षम व उत्तम गुण मिळवण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना पसंतीच्या विषयाची निवड करता येणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे मत नवी दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिएशनचे (एनबीए) अध्यक्ष डॉ. के. के. अगरवाल यांनी व्यक्त केले.

‘जेएसपीएम’च्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने (आरएससीओई) शैक्षणिक स्वायत्ततेसह अभ्यासक्रमाची नवीन सुरुवात केली आहे. त्यानिमित्त ताथवडे येथील ‘जेएसपीएम’च्या ‘आरएससीओई’ येथे नुकताच कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी एंप्रो इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, पुणे ‘जेएसपीएम’चे संचालक डॉ. आर. एस. जोशी, कॅम्पस संचालक डॉ. पी. पी. विटकर, ‘आरएससीओई’चे प्राचार्य डॉ. आर. के. जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अगरवाल म्हणाले, ‘शैक्षणिक स्वायत्ततेचा वापर कसा केला जातो यावर त्याचे भविष्य अवलंबून आहे. शैक्षणिक स्वायत्तता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि भविष्यामध्ये फायदेशीर ठरणारे विषय निवडण्याची मुभा देते. एज्युकेशन ४.०चे पर्व सुरू झाले आहे. आत्ताची पिढी ही सतत तीन स्क्रीनसमोर असते ते म्हणजे मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्ही. युवा पिढीला या तीन स्क्रीनद्वारे अधिकाधिक प्रशिक्षित कसे करता येईल हे शोधून त्या कलाने मुलांना शिक्षण देणे हे प्राध्यापकांचे कौशल्य आहे. प्रत्येक संधीचे सोने कसे करता येईल हे शोधणे आणि अनेक उपायांपैकी नक्की कुठल्या उपायाचा अवलंब करणे अधिक फायद्याचे असेल हे ठरवणे एका खर्‍या अभियंत्याचे कौशल्य आहे.’

‘आरएससीओई’चे प्राचार्य डॉ. जैन म्हणाले, ‘शैक्षणिक  स्वायत्ततेसह ‘आरएससीओई’ने चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम्सद्वारे (सीबीसीएस) अधिक व्यापक आणि  प्रभावशाली अभ्यासाचे वचन दिले आहे. ज्यामुळे वही पुस्तक नाही, तर कार्यरत प्रकल्पाच्या मदतीने अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य, जागतिक रोजगारक्षमता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दुसर्‍या शैक्षणिक वर्षीच विद्यार्थ्यांना विषयांचे विविध पर्याय व त्यांना आवडणाऱ्या विषयाची निवड करणे आता शक्य होणार आहे. यामध्ये जर्मन, जपानी, इंग्रजी, फ्रेंच या विदेशी भाषांचादेखील समावेश असेल.’

कॅम्पस संचालक डॉ. विटकर म्हणाले, ‘आज माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे. २००१साली १५० विद्यार्थी आणि १० शिक्षकांसह या इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली तेव्हा मी येथे प्राचार्य होतो. या वर्षी इन्स्टिट्यूटला १८वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ‘जेएसपीएम’चे सहा कॅम्पस आज पुण्यामध्ये कार्यरत आहेत. ‘जेएसपीएम’ शैक्षणिक स्वायत्ततेच्या क्षेत्रात पदार्पण करताना मला येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो.’

‘जेएसपीएम’चे संचालक डॉ. जोशी म्हणाले, ‘आम्हाला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शैक्षणिक स्वायत्ततेची औपचारिक मान्यता मिळाली होती, आम्ही अनेक सल्ले विचारात घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरुवात करत आहोत. शैक्षणिक स्वायत्ततासह आम्ही संशोधन आधारित शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देऊ इच्छितो. नवीन अभ्यासक्रमाची रचना ही जागतिक शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या असलेल्या आकांक्षा, औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षा यावर आधारलेली असेल, याचबरोबर या अभ्यासक्रमाचा लाभ घेत आमच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाद्वारे समाजात सुधारणा करत लोकांच्या समस्यांचे निवारण करावे, अशी आमची आशा आहे.’

‘एनप्रो इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्णा करकरे म्हणाले, ‘स्वत: अभ्यासक्रमाची रचना करण्याचे स्वातंत्र्य असणे तेवढेच जोखमीचे आणि जबाबदारीचे काम असते. ‘आरएससीओई’मध्ये उच्च शिक्षित प्राध्यापक असल्याकारणाने उत्तम अभियंते तयार होण्यास समाजाला मदत होणार आहे. शैक्षणिक विभागाचे तीन मुख्य भागधारक आहेत ते म्हणजे विद्यार्थी, शिक्षण प्रक्रिया आणि सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा भागधारक म्हणजे औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वोत्तम उमेदवार तयार करण्याची जबाबदारी ही इन्स्टिट्यूटच्या शिक्षण प्रक्रियेवर अवलंबून असते. कॉलेजमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे फक्त रोजगार कार्यक्षम न होता कुठल्याही कंपनीसाठी अमुल्य साधनसंपत्ती बनावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे.’

‘आरएससीओई’मध्ये स्वायत्त अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जूनपासून सुरू होणार असून, यामध्ये संगणक, आयटी, मेकॅनिकल, ईएनटीसी इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनीअरिंगसह एमबीए आणि एमसीए या स्ट्रिमचा समावेश असेल.

कविता मोहोळकर व अंबरीश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. ‘आरएससीओई’चे उपप्राचार्य डॉ. अविनाश देवस्थळी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search