Next
‘डाबर’तर्फे नवीन च्यवनप्राश दाखल
प्रेस रिलीज
Monday, July 23 | 05:22 PM
15 0 0
Share this story

‘डाबर’चा नवीन च्यवनप्राश सादर करताना दिनेशकुमार आणि कंपनीचे समूह उत्पादन व्यवस्थापक अक्षय कपूर.

पुणे :  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या आजारांशी सामना करण्यासाठी ‘डाबर’ने डबल इम्युनिटी च्यवनप्राश सादर  केला आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दर्जेदार वनौषधी वापरून हा च्यवनप्राश सिद्ध करण्यात आला आहे. हे नवीन उत्पादन नुकतेच पुण्यात सादर करण्यात आले. या वेळी डाबर इंडिया लि. समूह उत्पादन व्यवस्थापक, अक्षय कपूर आणि कंपनीच्या कार्पोरेट काम्युनिकेशन विभागाचे दिनेश कुमार उपस्थित होते.  

डाबर इंडिया लि. समूह उत्पादन व्यवस्थापक, अक्षय कपूर म्हणाले, ‘आयुर्वेदाचा समृद्ध वारसा आणि निसर्गाचे सखोल ज्ञान घेऊन डाबरने नेहमीच आयुर्वेदिक पुस्तके, हस्तलिखितांच्या अभ्यासातून सुरक्षित आणि प्रभावी आरोग्यसेवेवर भर दिला आहे. उत्पादनाद्वारे आम्ही भारतात विविध रोगांचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात लोक वनस्पतींमधील नैसर्गिक गुणधर्मामुळे त्यांना पसंती देताना दिसून येतात. डाबर च्यवनप्राश म्हणजे प्राचीन भारतीय आयुर्वेदाचे ज्ञान आणि विज्ञान यांचा मेळ घालून बनलेले उत्पादन आहे. हे उत्पादन म्हणजे दैनंदिन जीवनात होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करण्याचा रामबाण इलाज आहे.’

‘‘डाबर च्यवनप्राश’चे प्रमुख घटक असलेला आवळा आपल्या प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी महत्वपूर्ण घटक म्हणून ओळखला जातो., त्याशिवाय इतर वनौषधींमुळे सामान्य संक्रमण आणि श्वसन व्यवस्थेच्या अॅलर्जींचे प्रमाण कमी करण्यात च्यवनप्राशची चांगली मदत होते’, असेही कपूर यांनी सांगितले. 

या उत्पादनाबाबत दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. परमेश्वर अरोरा म्हणाले, ‘च्यवनप्राश हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक सूत्रीकरण असून,  रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक दशकांपासून वापरले गेले आहे. डाबर च्यवनप्राश, आयुर्वेदिक परिशिष्टावर आधारीत आहे. डाबर च्यवनप्राश रोगप्रतिकारक शक्ती वाढवून, विविध रोगांना प्रतिबंध घालण्याचे कार्य करते. रोगप्रतिकारक शक्ती, हवामानातील बदल, अनुनासिक अलर्जी व संक्रमण यावर परिणाम करते. च्यवनप्राशमुळे वात, पित्त व कफ या त्रिदोषांचा समतोल साधला जातो. पावसाळयामध्ये तापमानात घट आणि ओलावा वाढल्यामुळे संक्रमणाचा धोकादेखील वाढलेला असतो. त्यामुळे सर्दी-खोकला, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड आणि न्यूमोनिया यासारखे रोग पावसाळ्यात सर्वाधिक प्रमाणात आढळतात. ओले आणि दमट हवामान यामुळे रोगजंतूच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली असते, अशातच रोगप्रतिकार शक्ती कमजोर असल्यास संक्रमण अधिक प्रमाणात होऊ शकते. अशा वेळी विविध औषधी वनस्पती सुदृढ जीवनशैलीसाठी लाभदायक ठरतात. त्याकरता दररोज डाबर दोन चमचे च्यवनप्राश खाणे उपयुक्त ठरते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link