Next
‘गडकरी, सावरकरांनी काव्यलेखनाने छत्रपतींचा इतिहास घराघरांत पोहोचविला’
कल्याणमधील साहित्य जल्लोषात कवी, लेखक अरुण म्हात्रेंचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, May 28, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : ‘भाषाप्रभू राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खऱ्या अर्थाने छत्रपतींचा इतिहास आपल्या काव्यलेखनाने घराघरात पोहचविला. छत्रपतींनी हिंदुत्वाचा भगवा उभा केला असे वर्णन या दोन्ही भाषाप्रभुंनी यथार्थपणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविले,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी कल्याणमध्ये केले.

कल्याणच्या भगवा तलाव येथील राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे भाषाप्रभू राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २५ व २६ मे २०१९ रोजी साहित्य जल्लोष आयोजित केला होता. कल्याणकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेल्या या साहित्य जल्लोषात २६ मे रोजी ते बोलत होते. या वेळी निवेदिका प्राची गडकरी यांनी गडकरी यांचे साहित्य आपल्या शैलीत वर्णन केले.

या साहित्य जल्लोषाचा प्रारंभ २५ मे रोजी काव्यवाचनाने झाला. या काव्यवाचनात सुमारे ५० कवी सहभागी झाले होते. काव्यवाचनाचा शुभारंभ शिवसेनेचे संभाजीनगरचे संपर्कप्रमुख विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व कवींनी विविध कवितांचे वाचन करतानाच गडकरी व सावरकर यांच्यावरही कविता सादर केल्या. या काव्यवाचनाचे संयोजन कवी किरण जोगळेकर यांनी केले. परीक्षक म्हणून अरविंद म्हात्रे यांनी काम पाहिले. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणचे शिक्षण महर्षी व कवी विजय पंडित, राममारुती समाधी संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी, लेखिका सोनाली दिघे, माजी आमदार प्रभाकर संत, पत्रकार तुषार राजे, पुरुषोत्तम फडणीस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची राजे यांनी केले. 

विविध कवींच्या कवितांबरोबरच कवी विजय पंडित, किरण जोगळेकर व जमशेदपुरहून खास उपस्थित असलेल्या मृदुला राजे यांनी आपल्या कविता व गझल सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या स्पर्धेत धनाजी बुटेरे, मनोज केळकर आणि सुधाकर कांबळी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, तर सागरराजे निंबाळकर, प्रतिभा नेरकर व कल्याणी नेवे यांना उत्तेजनार्थ रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.


२६ मे रोजी आयोजित कार्यक्रमात म्हात्रे यांनी आपल्यासह अनेक कवी व साहित्यिकांवर आजही राम गणेश गडकरी यांच्या साहित्यांचा विलक्षण प्रभाव आहे असे सांगत आजच्या पिढीला पाश्चात देशाचे आकर्षण वाटते. भारताविषयी जिव्हाळा, प्रेम, निष्ठा वाटत नाही. याचे मुख्य कारण त्यांना भाषाप्रभू राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर सावरकर ठाऊक नाहीत. सावरकरांनी सोसलेल्या यातना, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचा कवितांचा अर्थ, मराठी भाषेची लज्जत माहिती नसल्याचे सांगितले. 

म्हात्रे म्हणाले की, ‘गडकरी व सावरकर यांचे लिखाण राष्ट्रप्रेमाने भरलेले असे. सावरकर फक्त हिंदुत्वनिष्ठ नव्हते, तर विज्ञानवादी होते. अनेक जाती व रुढी-परंपरा मोडीत काढण्याचे काम सावरकरांनी केले. छत्रपतींवर त्यांची श्रद्धा होती. शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे नव्हे, तर हिंदुत्वाचे राज्य उभे केले, असे ते नेहमी सांगत. ब्रिटीशांविरुद्ध लढताना प्रसंगी लेखण्या मोडून बंदुका हातात घ्या हे सांगणारे सावरकर एकमेव होते.’ राम गणेश गडकरी यांचे अनेक उतारे व कविता म्हात्रे यांनी सादर केल्या.

गडकरी यांचे चार अक्षरी नाव घेताच मनात देवीची मूर्ती तयार होते, तर सावरकरांचे नाव घेताच स्वातंत्र्यदेवेतेची मूर्ती समोर येते, असे सांगत निवेदिका प्राची गडकरी यांनी गडकरी व सावरकरांच्या साहित्यातील अनेक पैलू उभे केले. ‘कवी, नाटककार, शाहीर, चरित्रकार, पत्रकार असे विविध पैलू असणारे सावरकर, तर गडकरी म्हणजे कवी केशवसुत अत्यंत काटेकोर, नियमबध्द, यमक जुळवत काव्य करीत. गडकरी यांनी काव्याचे सर्व नियम झुगारत मुक्तछंद हा नवा काव्यप्रकार आणला. स्त्री-पुरुष समानता, मुलींचे दु:ख, स्त्रीभृण हत्या आदी विषय हाताळतानाच ईश्वराला फुले वाहण्याऐवजी देशावर प्रेम करा, असे ते सांगत. गडकरी यांच्या काव्याचा स्वतंत्र संप्रदाय होता,’ असे प्राची गडकरी यांनी सांगितले

या कार्यक्रमात सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रख्यात निवेदिका अनुश्री फडणीस यांनी केले. दोन्ही दिवशीच्या समारोहास . कवी प्रवीण देशमुख, पत्रकार माधव डोळे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, नाटककार नाना शेळके आदींसह शहरातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search