Next
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी वेदा मुकादम
BOI
Tuesday, July 02, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा पदग्रहण सोहळा येथील अंबर हॉलमध्ये नुकताच पार पडला. सन २०१९-२० साठी रोटेरियन वेदा मुकादम यांची अध्यक्षपदी, नीता शिंदे यांची सचिवपदी, तर जयेश काळोखे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. पदग्रहण अधिकारी रोटेरियन जयश्री कामत यांनी या तिघांकडेही पदभार सोपवला. 

या वेळी व्यासपीठावर राजेंद्र भुर्के, प्रकल्प आराध्ये, दिलीप रेडकर, मावळते अध्यक्ष मुकेश गुप्ता, पदग्रहण अधिकारी जयश्री कामत, नीता शिंदे, जयेश काळोखे, देवदत्त मुकादम उपस्थित होते. विश्वशांतीसाठी प्रार्थना केल्यानंतर नीलेश मुळ्ये यांनी ‘फोर वे टेस्ट’चे वाचन केले. नारळ बोर्डाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, दिलीप अवसरे यांसह रोटरीच्या सदस्यांनी दीपप्रज्वलन करून पदग्रहण सोहळ्याचे उद्घाटन केले. 

रेडकर यांनी अहवाल सादर केला. मुकेश गुप्ता यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे गेल्या वर्षभरातील रत्नागिरी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. यानंतर मीरा मंदार सावंतदेसाई, ओम जयेश काळोखे, खुशी प्रसाद हातखांबकर व सौम्या देवदत्त मुकादम या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष रोटेरियन मुकेश गुप्ता यांच्या हस्ते पदग्रहण अधिकारी कामत यांचा प्रकल्प आराध्ये यांचा सत्कार करण्यात आला. रोटेरियन सचिन शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 

मरीनर दिलीप भाटकर यांनी कामत यांचा परिचय करून दिला. रोटेरियन नीलेश मुळ्ये, राहुल पंडित आणि विनायक हातखांबकर यांनी रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. पदग्रहण अधिकारी कामत यांनी वेदा मुकादम यांना अध्यक्षपदाची, नीता शिंदे यांना सचिवपदाची तर जयेश काळोखे यांना खजिनदारपदाची सूत्रे प्रदान केली. त्यानंतर कामत यांनी उपस्थित रोटेरियनना मार्गदर्शन केले.

‘लहान मुलींची सुरक्षितता आणि स्वच्छता’ याविषयी तळागाळातल्या शाळांमध्ये जाऊन काम करणार असल्याची घोषणा रोटरीच्या नूतन अध्यक्ष वेदा मुकादम यांनी केली. रत्नागिरीतील बिझनेसमनसाठीदेखील काम करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. नीता शिंदे यांनी आभार मानले. इशानी पाटणकरने गायलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने सोहळ्याची सांगता झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search