Next
‘बर्कलेज’ आणि ‘टीसीएस’ची भागीदारी
लोकोमोटर व्यंगत्व असणाऱ्या मुलांच्या साह्यासाठी पुढाकार
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 01:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे/मुंबई : टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या जागतिक आघाडीच्या आयटी सर्व्हिसेस, कन्स्लटिंग आणि बिझनेस सोल्युशन कंपनीने ‘बर्कलेज’सोबत हातमिळवणी करून पुण्यातील झेप रिहॅबिलिटेशन येथे ‘टीसीएस व्हीहॅब सोल्युशन’ची (व्हर्च्युअल हॅबिलिटेशन) सुरुवात केली. न्युरो-मस्क्युलर व्यंग असणाऱ्या मुलांना यातून अधिक स्वावलंबी बनण्यास साह्य केले जाणार आहे.

या भागीदारीचा भाग म्हणून रीच- बर्कलेजच्या डिसॅबिलिटी अॅंड मेंटल हेल्थ नेटवर्क विभागातर्फे हार्डवेअर आणि साधने पुरवली जातील. ‘टीसीएस’ त्यांच्या ‘व्हीहॅब’ यंत्रणेला पाठबळ देत त्याची अंमलबजावणी करेल. पुण्यातील झेप रिहॅबिलिटेशन सेंटर येथे ‘बर्कलेज’चे वरिष्ठ संचालक सीआन डंफी आणि ‘टीसीएस’च्या इन्क्युबेशन, रिसर्च अॅंड इनोव्हेशन विभागाच्या प्रमुख अनिता नानाडीकर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

‘टीसीएस’ची संकल्पना, डिझाइन आणि निर्मिती असलेले ‘व्हीहॅब’ हे डिजिटल असिस्टिव्ह सोल्युशन आहे. सेरेब्रल पाल्सी किंवा ऑटिझममुळे लोकोमोटर व्यंग असलेल्या मुलांसाठी फिजिओथेरपीची पथ्ये अधिक परिणामकारक व्हावीत यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधेत आकर्षक व्हीआर वातावरणात मोशन सेंसर, आधुनिक अॅनालिटिक्स, गेश्चर अॅनालिसिस, फिंगर मॅपिंग आणि रिअल टाइम सिम्युलेशनचा वापर केला जातो. यातून आकर्षक वातारवणात वैयक्तिक अनुकरणीय वातावरणाची निर्मिती केली जाते. त्यामुळे, मुलांना आनंदी वातावरणात संवाद साधता येतो आणि प्रत्यक्ष आयुष्यातील जगण्याशी संबंधित कामे करण्यासाठीची कौशल्ये विकसित करता येतात.

विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठीच्या तीन शाळांमधील ५०० हून अधिक मुलांवर ‘व्हीहॅब’ यशस्वीरित्या वापरले जात आहे. याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. या मुलांमध्ये लक्ष देणे, एकाग्रता आणि शिकण्याशी संबंधित इतर कौशल्यांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

या प्रसंगी ‘बर्कलेज’चे वरिष्ठ संचालक सीन डंफी म्हणाले, ‘भारतातील विशेष गरजा असलेल्या लोकसंख्येच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक उत्साही मार्गक्रमणाची ही सुरुवात झाली आहे. जगभरात हा प्रयोग केला जाईल. आपण ज्या समाजात राहतो, जिथे काम करतो त्या समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाटी दोन जागतिक कंपन्या आपले वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य घेऊन एकत्र आल्याचे हे एक अप्रतिम उदाहरण आहे.’

‘टीसीएस’चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर के. अनंत कृष्णन म्हणाले, ‘मोशन सेन्सिंग तंत्रज्ञान, वेअरेबल्स आणि गेमिफिकेशन यात आधुनिकता आल्याने डिजिटल टेक्नॉलॉजी पर्याय हेल्थकेअर आणि वेलनेस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडवत आहेत. लोकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष परिणाम करणारे तंत्रज्ञान वापरण्यात टीसीएस आघाडीवर आहे. ऑटिझमच्या संपूर्ण कक्षेवर परिणाम करून शकेल अशा पद्धतीने ‘व्हीहॅब’ची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे अनोखे व्यासपीठ अधिकाधिक मुलांसोबत नेण्यासाठी बर्कलेजसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.’

झेप रिहॅबिलिटेशन सेंटर या स्वयंसेवी संस्थेची स्थापना २००८मध्ये करण्यात आली. लोकोमोटर व्यंग असणाऱ्या मुलांना गतिशीलता वाढवण्यात साह्य करण्यासाठी खास आखलेले उपक्रम त्यांच्यातर्फे राबवले जातात. या कार्यक्रमांतून दैनंदिन जगण्यातील कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये आणि शैक्षणिक कौशल्ये विकसित केली जातात आणि मुलांची सामाजिक-आर्थिक स्थिती लक्षात न घेता हे कार्यक्रम त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले जातात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search