Next
‘सिस्का’ची ‘सुयिन’ व ‘बायोमेट्रॉनिक’ सोबत भागीदारी
BOI
Friday, September 14 | 03:05 PM
15 0 0
Share this storyमुंबई : भारतातील सिस्का ग्रुपने बायोमेट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड (सिंगापूर) व सुयिन ऑप्ट्रोनिक्स, कॉर्प. (तैवान) यांच्या भागीदारीने भारतातील पहिला कॅमेरा मोड्युल कारखाना सुरू करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ३० दशलक्ष डॉलर (अंदाजे २०० कोटी) गुंतवणूक करून नोएडा येथे हा कारखाना सुरू केला जाणार असून, ही गुंतवणूक तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट्सचे स्थानिकीकरण व उत्पादन यासाठीच्या वाढत्या मागणीला मदत होण्याच्या दृष्टीने कॅमेरा मोड्युल कारखाना स्थापन करण्यात आला आहे.

सुयिन ऑप्ट्रोनिक्स मोबाइल फोन, ऑटोमोटिव्ह उद्योग (रिअर व्ह्यू कॅमेरा), वैद्यकीय, सुरक्षा उद्योग (सीसीटीव्ही) व संरक्षण उद्योग (ड्रोन्स) यासाठी कॅमेरा मोड्युलचे उत्पादन करणार आहे. कारखान्यामध्ये दरमहा पाच दशलक्ष नगांची उत्पादनक्षमता असेल आणि इमेज सेन्सर्ससाठी पहिला सीओबी (चिप-ऑन-बोर्ड) प्रकल्प सुरू करण्यासाठी विस्तार योजनेसाठी दरमहा १० दशलक्ष नगांची उत्पादनक्षमता असेल. स्थानिक डिझाइन व विकास करण्याची क्षमता यांना चालना देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) स्थापन केले जाईल. हे केंद्र या उद्योगाच्या सहयोगाने ऑप्टिकल, मेकॅनिकल व सेन्सर पॅकेजिंग थ्रुपुट्स यासाठी सोल्यूशन्स तयार करणार आहे.

सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने, एखाद्या जागतिक कंपनीकडून पहिल्यांदाच भारतात कॅमेरा मोड्युल कारखाना स्थापन केला जात आहे. सरकारने नुकतीच भारतात ड्रोन्सच्या वापराला कायदेशीर स्वरूप देण्याची परवानगी दिली आहे आणि यामुळे सुयिन ऑप्ट्रोनिक्सला भारतात ड्रोन कॅमेऱ्यांची निर्मिती करणे अधिक फायद्याचे ठरणार आहे. नव्या कंपनीमध्ये सिस्का ग्रुपचा हिस्सा ४९ टक्के आहे, तर बायोमेट्रॉनिकचा हिस्सा ४१ टक्के व सुयिन ऑप्ट्रोनिक्सटा हिस्सा १० टक्के आहे.

नव्या व्यवसायाविषयी बोलताना, ‘सिस्का’चे संचालक राजेश उत्तमचंदानी म्हणाले, ‘भारतात कॅमेरा मोड्युल्सचे प्रवर्तक ठरण्याच्या उद्देशाने सुयिन ऑप्ट्रोनिक्स व बायोमेट्रॉनिक यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नवे तंत्रज्ञान, नाविन्य व अद्ययावत प्रकल्प यामुळे आम्ही कॅमेरा मोड्युल्सचे उत्पादन टप्प्याटप्प्याने करणार आहोत; तसेच आम्ही सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि भारतात कारखाना स्थापन केल्याने आम्हाला या उपक्रमासाठी योगदान देणे शक्य होईल व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही मदत होईल.’

‘सुयिन’चे अध्यक्ष गॅरी ली म्हणाले, ‘आमच्या भागीदारांच्या बरोबर आमच्या नव्या उत्पादन प्रकल्पाची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. भारताचा ७.४ टक्के दराने आर्थिक विकास, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिकसाठी असलेली देशांतर्गत मागणी व परदेशी कंपन्यांनी देशात उत्पादन करावे यासाठी सरकारे दिलेले उत्तेजन यामुळे आम्हाला येथे उत्पादनाचा भक्कम पाया निर्माण करण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली. या प्रकल्पामुळे आम्ही संशोधन व तंत्रज्ञान विकास याद्वारे स्वयंपूर्ण होणार आहोत.’

‘योग्य तंत्रज्ञान एकत्र आणणे, अचूक भागीदारी करणे व अनुकूल, शाश्वत वातावरण निर्माण करणे यामुळे ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला आणखी पाठबळ मिळेल. इमेज सेन्सर पॅकेजिंग व फिनिश्ड कॅमेरा मोड्युल यांचा समावेश असलेला अत्यंत सोफिस्टिकेटेड उत्पादन प्रकल्प उभारणे, ही आमच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे,’ असे ‘बायोमेट्रॉनिक’चे प्रमोटर व व्यवस्थापकीय संचालक प्रभू श्रीधरन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link