Next
‘येस बँके’च्या ‘सीईओ’पदी राणा कपूर यांची फेरनियुक्ती
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतामध्ये खासगी क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असलेल्या येस बँकेची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२ जून रोजी झाली. त्यात बँकेच्या समभागधारकांनी १३ ठराव प्रचंड बहुमताने मंजूर केले. ८ जून २०१८ ते ११ जून २०१८ या कालवाधीत रिमोट ई-व्होटिंगद्वारे, तसेच १२ जून २०१८ रोजी सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यात आले आणि त्यांचे नंतर एकत्रिकरण करून निर्णय घेण्यात आला.

तीन वर्षांसाठी राणा कपूर यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनियुक्ती करण्याच्या ठरावाला समभागधारकांनी प्रचंड बहुमताने समर्थन दिले. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर एक सप्टेंबर २०१८ पासून ही फेरनियुक्ती होईल. बिगर-कार्यकारी आणि नॉन-इंडिपेंडंट संचालक म्हणून सुभाष चंदेर कालिया यांची नियुक्ती, तर अजय कुमार यांची फेरनियुक्ती करण्यात आली. रेन्ताला चंद्रशेखर, डॉ. प्रतिमा शौरी यांची पाच वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

समभाग (क्यूआयपी/एडीआर/जीडीआर/एफसीसीबी) जारी करून एकूण एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवल उभे करण्यासंदर्भातील विशेष ठराव समभागधारकांनी मंजूर केला. कर्जाऊ स्वरूपात किंवा कर्जरोख्यांमार्फत भारतीय/विदेशी चलनात ३० हजार कोटी रुपयांचा निधी उभा करायचा. तथापि, या कर्जरोख्यांवर अपरिवर्तनीय, मीडियम टर्म नोट्स आणि बॉंड्स अशी बंधने नसावीत. या विशेष ठरावालाही भागधारकांनी मंजुरी दिली. एकूण कर्ज घेण्याची बँकेची मर्यादा वाढवून एक लाख १० हजार कोटी रुपये करण्याच्या विशेष ठरावाला समभागधारकांनी मान्यता दिली. प्रत्येकी दोन रुपयांच्या समभागावर २.७ रुपये (म्हणजेच १३५ टक्के) लाभांश देण्याच्या संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीला प्रचंड बहुमताने मंजुरी देण्यात आली.

३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (स्वतंत्र आणि एकत्रित) समभागधारकांनी स्वीकारला. बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून चार्टर्ड अकाऊंटन्ट मे. बी एस आर अॅंड कंपनी एलएलपी यांची फेरनियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. येस बँक आणि तिच्या उपकंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी `वायबीएल ईएसओएस-२०१८` नावाची नवी एम्प्लॉई स्टॉक ऑपश्न स्कीमला भागधारकांनी मंजुरी दिली.

याप्रसंगी येस बँकेचे अकार्यकारी संचालक अशोक चावला म्हणाले, ‘बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन, बँकेचा व्यवसाय आणि वित्तीय कामगिरी, तसेच विकास योजना आणि उच्च प्रोफेशनल दर्जा राखण्याचा घेतलेला निर्णय यावर संस्थात्मक आणि रिटेल भागधारकांनी दाखविलेला विश्वास आणि निष्ठा पाहून आम्ही खूप समाधानी आहोत. प्रस्थापित संस्थांबरोबरच आघाडीच्या फिनटेक संस्थाच्या धोरणात्मक सहकार्यामुळे येस बँक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने पूर्णपणे सुसज्ज आहे. त्या आधारे ग्राहकसेवा आणखी मजबूत करण्यासह भारतातील एकूण बँकिंग उद्योगाच्या दृष्टीने बळकट प्रणाली विकसित करण्यात येत आहे.’

येस बँकेच्या १४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक मंडळाचे अकार्यकारी (स्वतंत्र) अध्यक्ष तसेच स्टेकहोल्डर्स रिलेशनशिप कमिटी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटीचे अध्यक्ष अशोक चावला यांच्यासह स्वतंत्र संचालक तसेच ऑडिट कमिटीचे अध्यक्ष वसंत व्ही. गुजराथी, स्वतंत्र संचालक तसेच नॉमिनेशन्स अॅंड रिम्युनरेशेन कमिटीचे अध्यक्ष ब्रह्म दत्त, बिगर-कार्यकारी नॉन-इंडिपेन्डन्ट संचालक तसेच रिस्क मॉनिटरिंग कमिटी आणि बोर्ड क्रेडिट कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार, स्वतंत्र संचालक तसेच सर्व्हिस एक्सलेन्स, ब्रॅंडिंग अॅंड मार्केटिंग कमिटीचे अध्यक्ष ले. जन. (डॉ.) मुकेश सभरवाल (निवृत्त), स्वतंत्र संचालक (वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्ती) डॉ. प्रतिमा शौरी, स्वतंत्र संचालक (वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्ती) रेन्ताला चंद्रशेखर, बिगर-कार्यकारी नॉन-इंडिपेंडन्ट संचालक (वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्ती सुभाषचंद्र कालिया आणि येस बँकेचे व्यवस्थापकी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर हे नऊ सदस्यीय संचालक मंडळ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link