Next
इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:मुंबई : एमजी मोटर्सने (मॉरिस गॅरेज) अलीकडेच ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे जागतिक स्तरावर अनावरण केले आहे. ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच सादर होणार असून, या वर्षी डिसेंबरपर्यंत ही कार भारतात दाखल होणार आहे. ती देशातील पहिली ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

जे पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे आणि त्यांना कनेक्टेड मोबिलिटी फीचर्ससहित अत्याधुनिक वाहनाची आकांक्षा आहे, अशांसाठी ‘एमजी इझेडएस’ बनविण्यात आली आहे. भारतातील दाखल झाल्यानंतर ही कार युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि मध्य पूर्व देशांमध्येदेखील सादर केली जाणार आहे.

‘एमजी मोटर इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवथापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘आधुनिक डिझाइन आणि प्रगत टेक्नॉलॉजीच्या बळावर ‘एमजी इझेडएस’ भारतात पर्यावरण-मित्र सोल्युशन्सच्या बाबतीत एका नवीन प्रकरणाची अग्रदूत बनेल. ही गाडी सादर होईपर्यंत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या फेम टू (FAME II) योजनेअंतर्गत इलेक्टिक व्हेइकलसाठी सबसिडी जाहीर केली असेल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे लोक पर्यावरण-अनुकूल अशी मोबिलिटी सोल्युशन्स विकत घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. ‘इझेडएस’ची इतर मोजमापे आणि वैशिष्ट्ये मागाहून जाहीर करण्यात येतील.’

देशभरात १२० विक्री आणि सेवा आउटलेटच्या जाळ्यासह ‘एमजी’चे लक्ष्य भारतीय ग्राहकांना वाहनाच्या मालकीचा सुलभ अनुभव मिळेल याची खातरजमा करण्याचा आहे. या व्यतिरिक्त ‘एमजी’ भारतीय नागरिकांना इलेक्ट्रिक व्हेइकल ड्रायव्हिंग श्रेणी बाबतच्या शंका दूर करण्यासाठी आणि चार्जिंगबाबत माहिती देण्यासाठी उपाययोजना करेल. ‘इझेडएस’मध्ये ‘एमजी’ची आयस्मार्ट नेक्स्ट-जेन तंत्रज्ञान देखील असेल, जे भारतात या वर्षी जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या एमजी हेक्टर एसयूव्हीमध्ये पहिल्यांदा आढळून येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search