Next
‘साय-फाय करंडक’च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, October 09, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : क्विक हील फाउंडेशन, थिएटर अॅकॅडमी आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांचा संयुक्त उपक्रम ‘साय-फाय करंडक’साठी महाराष्ट्र राज्यातून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. साय-फाय करंडक ही एक एकांकिका स्पर्धा असून, तिचा उद्देश तत्कालीन थिएटरच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जागरूकता पसरवणे हा आहे.

यासंदर्भातील प्रवेशिका कॉलेज, स्वतंत्र गट आणि थिएटर संस्थांकडून १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. सहभागी टीम नाट्य वर्तुळातील नोंदणीकृत गट असणे अनिवार्य आहे. साय-फाय करंडक २०१७च्या पहिल्या आवृत्तीत १००पेक्षा अधिक टीमनी सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली होती. थिएटर अॅकॅडमी आपले अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रसाद पुरंदरे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील कान्या-कोपऱ्यातून आलेल्या प्रादेशिक केंद्रांच्या टीम्सची निवड केली जाईल.

या टीम अशा समकालीन विचारप्रवण एकांकिका सादर करतील, ज्यांमध्ये डिजिटल दुनियेत आजच्या जीवनाचे प्रतिबिंब दिसत असेल. साय-फाय करंडकाच्या माध्यमातून क्विक हील फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांची सायबर सुरक्षा जागरूकता आणण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करून एक सुरक्षित सायबर विश्व उभे करण्याची वचनबद्धता व्यक्त होते. साय-फाय करंडक २०१८ मध्ये अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका १६ डिसेंबर २०१८ रोजी ग्रँड फिनालेमध्ये सादर होतील व त्यावेळी या कलाकारांना नाटक, सिनेमा आणि टीव्हीवरील मान्यवर कलाकारांच्या ज्यूरी पॅनलसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर म्हणाले, ‘२०१८च्या या एकांकिकांच्या स्पर्धात्मक उत्सवासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस आणि थिएटर अॅकॅडमीशी सहयोग केला आहे, जे या उत्सवातील सर्व प्रक्रियांमध्ये सहाय्य करतील. या वर्षी आम्ही महाराष्ट्रातील अधिक व्यापक क्षेत्रांतून प्रवेशिका मागवल्या आहेत ज्यामुळे ठिकठिकाणचे नाट्य कलाकार आणि विविध विषय सामील होऊ शकतील. आम्हाला खात्री आहे की, या उत्सवामुळे सहज प्राप्य आणि सुखद अशा डिजिटल विश्वाशी संबंधित धोके लोकांच्या ध्यानात येतील.’

‘साय-फाय करंडक’ नोंदणीसाठी संपर्क : ८३९० ०४१३९, ९६५७४ ४२९५७.
ई-मेल आयडी : theatreacademypune@gmail.com
वेबसाइट : www.cyfiarts.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link