Next
रत्नागिरी जिल्हा ग्रामीण डाकसेवक पतसंस्थेचा दशकपूर्ती सोहळा दिमाखात साजरा
BOI
Wednesday, August 28, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना डाकघर अधीक्षक अप्पासाहेब कोड्डा. डावीकडून सुनील यादव, यशवंत सूर्यवंशी, महेश सावंत आदी. (छायाचित्र : प्रसाद जोशी)

रत्नागिरी :
‘रत्नागिरी जिल्हा ग्रामीण डाकसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी’ या टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवकांच्या सहकारी पतसंस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच साळवी स्टॉप नाचणे लिंक रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात साजरा झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी टपाल विभागाचे डाकघर अधीक्षक अप्पासाहेब कोड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रवर डाकघर अधीक्षक यशवंत सूर्यवंशी व विशेष अतिथी म्हणून मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मानद सचिव महेश सावंत उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक व मानद सचिव सुनील यादव यांनी आपल्या मनोगतात दशकपूर्ती वाटचालीचा आढावा घेतला. प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार करण्यात आले.



या वेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. खात्यातील परीक्षा देऊन सेवाबढती झालेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला. सभासदांच्या गुणवंत पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी आकस्मिक निधन झालेल्या संस्थेच्या सात सभासदांच्या वारसांना प्रत्येकी ७० हजार रुपयांप्रमाणे वारस सहायता निधी देण्यात आला. शहरातील एका शैक्षणिक संस्थेतील १२ गरीब व होतकरू मुलांच्या फीच्या रकमेतील काही भाग संस्थेच्या वतीने भरून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन विलास पळसुलेदेसाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालन महेंद्र पाटणकर यांनी केले. या सोहळ्याला टपाल खात्यातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search