Next
अभिनेते शरद पोंक्षे यांची कर्करोगाशी झुंज यशस्वी
पुन्हा एकदा नव्या नाटकाच्या तालमीसाठी सज्ज
BOI
Thursday, July 18, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

शरद पोंक्षेमुंबई : सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा अभिनयासाठी सज्ज झाले आहेत. ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून ते पुन्हा रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचून कर्करोगाशी लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे... 

नुकतीच एका वृत्तवाहिनीने घेतलेली अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलाखत पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सहा महिने हा माणूस अचानक कुठे गायब झाला होता, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पोंक्षे यांची तब्येत खालावली असल्याचे मुलाखतीत दिसले. त्याचे कारण त्यांच्या स्पष्टीकरणानंतर कळले. कर्करोगासारख्या भयानक आजाराशी यशस्वीपणे झुंज देऊन आपण ही लढाई जिंकली असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.


‘माणूस आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरून जात असतो. असाच एक भयंकर टप्पा मीदेखील मागच्या काही महिन्यांमध्ये अनुभवला. डिसेंबरमध्ये अचानक बरे वाटेनासे झाले. तपासणीनंतर कर्करोगाचे निदान झाले. माझ्यावर सावरकरांचा प्रभाव असल्याने लोकांची खोटी सहानुभूती मला नको होती. त्यामुळे या गोष्टीची मी कुठेच वाच्यता केली नाही. आता सर्वांसमोर येऊन ही गोष्ट मी सांगत आहे. कारण आता मी ही कर्करोगाची लढाई जिंकली आहे,’ असे पोंक्षे यांनी सांगितले. उपचारांनंतर आपण पूर्ण बरे झालो असून,  पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करत असल्याचेही पोंक्षे यांनी सांगितले. 

या आजाराच्या सहा महिन्यांच्या काळातील त्यांचा अनुभव विचारला असता ते म्हणाले, ‘हे सहा महिने खूप अवघड होते. या दरम्यान सावरकरांनी लिहिलेले ‘ माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाली. आजवर २५ वर्षे मी एकही दिवस रजा न घेता काम केले आहे, असे असताना तीन-चार महिने घराचा उंबरठाही ओलांडायचा नाही, हे माझ्यासाठी खूप अवघड होते. परंतु ते पुस्तक वाचल्यावर माझ्या विचारांत बदल झाला. एखादा माणूस देशासाठी ११ वर्षे  साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत एका छोट्याशा खोलीत राहू शकतो, तर मी स्वतःसाठी फक्त सहा महिने नक्कीच राहू शकत होतो.’

हेही जरूर वाचा :

सोनाली बेंद्रे नव्या जोमाने पुन्हा कामावर..

मन कोणत्याही विकारावर मात करू शकते : पर्रीकर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search