Next
रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनचा हीरक महोत्सव
BOI
Monday, April 22, 2019 | 03:33 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध शासकीय तंत्रनिकेतन ६०व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेकडून चार व पाच जानेवारी २०२० रोजी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सन १९६०-६१च्या दरम्यान पहिल्यांदाच कोकणात तांत्रिक शिक्षण देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनची पहिली मान्यता महाराष्ट्र शासनाकडून आली. त्यानंतर कोकणातल्या विद्यार्थ्यांना भविष्याची नवी क्षितिजे खुणावू लागली. पहिली तीस वर्ष सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल या तीन शाखांचे पदविका शिक्षण येथे दिले जात असे. गेल्या बावीस वर्षांत कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड टेलिकम्युनिकेशन, फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाची वाढ झाली. या व्यावसायिक शिक्षणानंतर मुलांना अगदी कमी वयात आपापल्या कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावता आला. काही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी शिक्षण घेण्यासाठी अन्य महाविद्यालयात गेले, तर काही पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशीसुद्धा गेले. अनेक विद्यार्थी इथल्या व्यावसायिक शिक्षणानंतर थेट नोकरीला लागले किंवा स्वतंत्र व्यवसाय करायला लागले.

गेल्या साठ वर्षांत जवळपास दहा हजार विद्यार्थी पदविका घेउन बाहेर पडले. देश-विदेशात अनेक ठिकाणी हे विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करत आहेत. मागील चार वर्षांपासून शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना काम करत असून, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवले जातात. चार व पाच जानेवारी २०२० ला स्थापनेपासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भूषण बेलवलकर यानी तंत्रनिकेतनचे प्राचार्य ग. च. खुरसाडे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामात पुढाकार घेतला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search