Next
इंट्राडे ट्रेडिंगची ओळख
BOI
Friday, March 15, 2019 | 10:55 AM
15 0 0
Share this article:

हल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणुकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी ‘इंट्राडे ट्रेडिंगची ओळख’मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची ओळख करून देताना भारतीय स्टॉक एक्स्चेंज, ट्रेडिंग करण्याची पद्धत सांगितली आहे.

डे ट्रेडिंग कशाला म्हणायचे, ट्रेडर म्हणजे कोण, यशस्वी ट्रेडरचे गुण, डे ट्रेडिंग आपल्यासाठी अनुकूल आहे का याची पडताळणी करण्यासाठी येथे काही मुद्दे दिले आहेत. शेअर बाजारातील प्रवेश, दलालांची निवड, जोखमीचे नियम व नियंत्रण, डे ट्रेडरने टाळावयाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.

ट्रेडिंगच्या दिवसाची सुरुवात, माहितेचे स्रोत, जागतिक शेअर बाजार, टेक्निकल अॅनालिसिसची पद्धत यावर विस्तृतपणे लिहिले आहे. बाजारात केव्हा प्रवेश करावा व केव्हा बाहेर पडावे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले आहे; तसेच सेन्सेक्स शेअर, निफ्टी शेअर आदी प्रकरणेही यात आहे.      

पुस्तक : इंट्राडे ट्रेडिंगची ओळख
लेखक : अंकित गाला, जितेंद्र गाला
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : १६९
किंमत : २२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search