Next
महाराष्ट्रातील पाच कलाकारांचे राजधानीत चित्रप्रदर्शन
BOI
Monday, December 31, 2018 | 05:49 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : नागपूर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापक व चित्रकारांनी एकत्र येत देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रविंद्रभवन कला दालनात ‘युटोपियन’ हे अनोखे चित्रप्रदर्शन भरवले आहे. 

मंडीहाऊस भागातील रविंद्रभवन कला दालनात २८ डिसेंबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन दोन जानेवारी २०१९ पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ललित कला अकादमीचे सचिव राजन फुलारी यांच्या हस्ते  झाले.

या प्रदर्शनात पाच चित्रकारांची एकूण ७२ चित्रे मांडण्यात आली आहेत. यातील तीन चित्रकारांनी अमूर्त चित्रकला प्रकारात, तर दोन चित्रकारांनी मानवी आकारांचा वापर करून चित्र सादर केली आहेत. मानवी आकारांच्या माध्यमातून दैनंदिन मानवी जीवनाचे चित्र मांडणारी सुभाष बाभुळकर यांची तीस व अब्दुल गफ्फार यांची १२ अशी एकूण ४२ चित्रे या ठिकाणी आहेत. 

निसर्गातील रंग व आकार यांची अमूर्त चित्रे रसिकांना आकर्षित करत आहेत. विकास जोशी यांची दहा, संजय जठार यांची १२ आणि किशोर इंगळे यांची आठ अशी एकूण 30 चित्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. 

दररोज सकाळी अकरा  ते सायंकाळी सात  वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.

कार्यक्रमाविषयी 
‘युटोपियन’ चित्रप्रदर्शन
स्थळ : रविंद्रभवन कला दालन, मंडीहाऊस, नवी दिल्ली 
दिवस व वेळ : दोन जानेवारीपर्यंत, सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत 

(स्रोत : महान्यूज )
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link