Next
‘शॉपमॅटिक’ची ‘नेटवर्क इंटरनॅशनल’सह भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : यूएईमधील लघु आणि मध्यम उद्योगांना डिजिटल कार्यपद्धतीसाठी सुसज्ज बनवत तेथील बहरत्या ई-कॉमर्स क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी ‘शॉपमॅटिक’ यूएईमध्ये दाखल झाली आहे. यासाठी ‘शॉपमॅटिक’ने मध्य-पूर्व प्रांत आणि आफ्रिकेतील अग्रणी पेमेंट सोल्युशन्स पुरवठादार कंपनी ‘नेटवर्क इंटरनॅशनल’बरोबर भागीदारी केली आहे.

नेटवर्क इंटरनॅशनलच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘गो ऑनलाइन’ या ई-कॉमर्स मंचाला ‘शॉपमॅटिक’चे पाठबळ लाभले आहे आणि स्थानिक लघु व मध्यम आकाराचे उद्योग, तसेच स्टार्ट-अप उद्योगांवर लक्ष केंद्रित करत या मंचाचे काम चालणार आहे.

‘शॉपमॅटिक’चे सीईओ अनुराग अवुला म्हणाले, ‘मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील वाढत्या ई-कॉमर्स बाजारपेठेला डिजिटल व्यापारासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ‘नेटवर्क इंटरनॅशनल’बरोबर केलेली भागीदारी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या घटनेमुळे सर्वाधिक उत्साहवर्धक हालचालींनी बहरलेल्या ई-कॉमर्स बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेतील आमच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि जगभरातील लघु व मध्यम उद्योजकांना त्याच्या ऑनलाइन व्यापारक्षेत्रातील प्रवासामध्ये पाठिंबा देण्याप्रतीची आमची बांधिलकी अधिकच दृढ झाली आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link