Next
‘हार्बिंजर समूहा’चा पुण्यात विस्तार
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


पुणे : जागतिक पातळीवर ई-लर्निंग व सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सेवा पुरविणार्‍या हार्बिंजर समूहातर्फे हिंजवडी येथे चौथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमध्ये २०० अतिरिक्त कर्मचारी काम करणार असून,  ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) आणि ब्लॉक चेन याच्याशी निगडीत नवीन तंत्रज्ञानावर काम करतील.

या प्रसंगी तंत्रज्ञानातील नवीन संधींबाबत बोलताना हार्बिंजर समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास जोशी म्हणाले, ‘जगभरात तंत्रज्ञानामुळे लोकांच्या शिकण्याच्या व काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. कार्यशील व्यक्तींना सक्षम करणारे सॉफ्टवेअर आम्ही हार्बिंजर समूहामध्ये विकसित करतो. उत्पादनातील अभिनवता, डिजिटल लर्निंग, एंटरप्राइज सॉफ्टवेअर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी आहेत.’

‘हार्बिंजरचा विकास हे या संधींचे एक उदाहरण आहे. हिंजवडी येथील आमचे नवीन केंद्र आमची विकासाप्रती असलेली कटिबद्धता दर्शवते. प्रत्येक कार्यस्थळी जीवन परिवर्तन घडवून आणणे या ‘हार्बिंजर’च्या ध्येयपूर्तीसाठी हे अत्याधुनिक केंद्र एक महत्त्वाचे पाऊल आहे,’ असे जोशी यांनी नमूद केले.

हार्बिंजर समूहाचे मुख्य कामकाज अधिकारी नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘एचआर तंत्रज्ञानाच्या अग्रभागी असलेल्या आमच्या कार्यामुळे आमची खात्री पटली आहे, कर्मचार्‍यांच्या अनुभवामध्ये जागतिक स्तरावर एक मोठा बदल घडत आहे. कर्मचारीबळामध्ये नवीन पिढीचा प्रवेश होत असताना एक परिवर्तनशील अनुभव प्रदान करणे गरजेचे असून, त्याचा प्रारंभ कार्यस्थळाच्या रचनेपासून होतो. ‘हार्बिंजर’च्या नवीन केंद्रामध्ये आपल्याला नव्या पिढीच्या या गरजा व आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या चैतन्यशील कार्यस्थळाची रचना दिसून येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search