मुंबई : ‘मोटोरोला’ या कंपनीतर्फे ‘मोटो ई५’ ही नवी मालिका सादर करण्यात आली असून यात मोठ्या स्क्रीन आणि बॅटरीच्या सहाय्याने ग्राहकांच्या मनोरंजनाच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यात येणार आहे.
लहान स्क्रीन आणि लवकर संपणारी बॅटरी या दोन प्रमुख समस्यांमुळे ग्राहकांना मनोरंजनात अडथला निर्माण होत होता. ग्राहकांची ही गरज ओळखून ‘मोटो ई५’ ही नवी मालिका सादर करण्यात आली आहे. यात मोठ्या स्क्रीन आणि बॅटरीच्या साहाय्याने ग्राहकांच्या मनोरंजनाच्या सर्व गरजा पूर्ण होणार आहेत. ई सीरीजमध्ये आजवर न आलेली मोठी बॅटरी आणि स्वच्छ डिस्प्ले घेऊन ही मालिका आली आहे. याचबरोबर पाच हजार एमएएच बॅटरीमुळे ग्राहकांना अविरतपणे, तासंतास मनोरंजन मिळेल आणि बॅटरी संपण्याची काळजी करावी लागणार नाही.

‘मोटो ई५ प्लस’मध्ये रिफ्लेक्टीव्ह वेव्ह पॅटर्न आणि कर्व्हड बॅंक डिझाइन आणि मॅक्स व्हिजन स्क्रीन डिस्प्ले आहेत. याचबरोबर १८ तासांपर्यंत व्हिडिओ, २०० तासांहून जास्त संगीत आणि सलग २० तासांहून अधिक वेळ इंटरनेट सर्फिंगसाठी पाच हजार एमएएच बॅटरी देण्यात आली आहे; तसेच १.२५ यूएम पिक्सेल्स आणि लेसर ऑटोफोकस असलेला १२ एमपी कॅमेरा सुस्पष्ट फोटो टिपायला मदत करणार असून, ढगाळ, अंधाऱ्या वातावरणातसुद्धा फोटोंचा दर्जा उच्च राखण्यात मदत करणात आहे. संपूर्णपणे समर्पित अशा मायक्रो एसडी कार्ड स्लॉट टूमुळे जास्त फोटो, गाणी आणि मुव्हीजचा साठा ठेवता येणार आहे.
‘मोटो ई५ प्लस’च्या कल्पक प्रतिसादांमुळे या फोन्सचा वापर आणखी सुखद होतो. मोटो डिस्प्लेमुळे सर्व नोटिफिकेशन्स आणि अपडेट्सचा आढावाफोन अनलॉक न करता एकाच वेळी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता येऊन शकतो. फक्त एका हलक्या स्पर्शाने तुम्ही काय नवीन घडत आहे याचा अंदाज घेऊ शकता आणि फोन अनलॉक न करता ई-मेल्सना आणि मेसेजसना उत्तरे देऊ शकता. जेव्हा गरज असेल तेव्हा फोनच्या मागे मोटोरोलाच्या बॅटविंग्ज लोगोमध्ये असलेल्या फिंगरप्रिंट रीडरद्वारेएका साध्या स्पर्शाने फोन अनलॉक करता येऊ शकतो. ‘मोटो e5 प्लस’ ‘Amazon.in’ वर आणि देशभरातील ६००हून अधिक मोटो हब स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. फाइन गोल्ड आणि काळ्या अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या फोनची किंमत ११ हजार ९९९ असून, शुभारंभाच्या काही आकर्षक ऑफर्ससह हे फोन उपलब्ध असतील.