Next
‘पाणीटंचाई न भासण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील’
नागेश शिंदे
Tuesday, December 18, 2018 | 06:12 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक ११मधील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी तेथे बोअरवेलला मंजुरी दिली. नुकतीच राठोड यांच्या उपस्थितीत तेथे बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाली. प्रभागाच्या नगरसेविका अनुसया डाके यांच्या मागणीचीही राठोड यांनी दखल घेतली. 

या वर्षी पाऊस अत्यल्प झाला असून, शहरालगत असलेले तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे बोअरवेल, विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करून पाण्याचा योग्य वापर केल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी सांगितले. 

‘उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही यासाठी नगरपंचायतीचे नगरसेवक व प्रशासन प्रयत्नशील आहे,’ असेही राठोड यांनी सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद अ. गनी, नगरसेविका अनुसया डाके, नगरसेवक प्रभाकरअण्णा मुधोळकर, रामभाऊ ठाकरे, सावन डाके, सरदार खान, सदाशिव सातव, विनायक मेंडके यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

पाणीटंचाई लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद यांनीही वॉर्डात बोअरवेल पाडली आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link