Next
निर्मिती क्षेत्रातील कलावंतांचा राज ठाकरेंच्या हस्ते गौरव
सहा जानेवारी २०१९ रोजी पुण्यात होणार कलातीर्थ पुरस्कारांचे वितरण
BOI
Wednesday, December 26, 2018 | 05:28 PM
15 0 0
Share this story

पुणे : निर्मितीचे कला क्षेत्रातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच निर्मिती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या १० व्यक्तींना/संस्थांना पुण्यातील ‘थर्ड बेल एंटरटेन्मेंट’ या संस्थेतर्फे  गौरविले जाणार आहे. त्यामध्ये सुनील बर्वे, सुनील फडतरे, अशोक हांडे, प्रसाद कांबळी आदींचा समावेश असून, महेश मांजरेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविले जाणार आहे. सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

‘थर्ड बेल एंटरटेन्मेंट’तर्फे गेली पाच वर्षे ‘कलातीर्थ पुरस्कार’ दिले जातात. ‘कलातीर्थ पुरस्कार - कलागौरव’, ‘कलातीर्थ पुरस्कार - वादनगौरव’, ‘कलातीर्थ पुरस्कार - नृत्यगौरव’, ‘कलातीर्थ पुरस्कार - दिग्दर्शनगौरव’ व ‘कलातीर्थ पुरस्कार - शब्दगौरव’ असे पुरस्कार गेली अनुक्रमे पाच वर्षे संस्थेतर्फे देण्यात आले होते. यंदा पुरस्कारांच्या सहाव्या वर्षी निर्मिती गौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. 

प्रसाद कांबळीसुनील फडतरे (श्री गणेश फिल्म्स), सुनील बर्वे (सुबक व हर्बेरियम), प्रसाद कांबळी (भद्रकाली प्रोडक्शन्स), संदेश भट (सुयोग प्रोडक्शन्स), शुभांगी दामले (महाराष्ट्र कल्चरल सेंटर), अरुण काकडे (आविष्कार थिएटर्स), शशांक सोळंकी (सेव्हन्थ सेन्स मीडिया), हृषीकेश देशपांडे (इंडियन मॅजिक आय), अशोक हांडे (चौरंग) आणि सागरिका दास (सागरिका म्युझिक) यांना ‘कलातीर्थ पुरस्कार - निर्मिती गौरव’ दिला जाणार आहे. महेश मांजरेकर यांना कै. मोहन वाघ निर्मिती गौरव पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सुनील बर्वेगेल्या वर्षीपासून निवेदक कै. भाऊ मराठे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘भाऊ मराठे स्मृती पुरस्कार’ निवेदक संदीप पंचवाटकर व निवेदिका मंजिरी जोशी यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडणारे ११ कलाकार व तंत्रज्ञांचादेखील सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे. दर वर्षीप्रमाणे आगामी प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट व मालिकांमधील कलाकारांशी मुक्त संवाद हेदेखील सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल. त्यामुळे रसिकांनी या सोहळ्याला जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन ‘थर्ड बेल एंटरटेन्मेंट’चे संस्थापक स्वप्नील रास्ते यांनी कळविले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
‘कलातीर्थ पुरस्कार - निर्मिती गौरव’ वितरण सोहळा
दिनांक : रविवार, सहा जानेवारी २०१९ 
वेळ : सायंकाळी पाच ते आठ वा.
स्थळ : सकळ ललित कलाघर, पुणे 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link