Next
‘रुबी’तर्फे कविता अ‍ॅँड गोपाल निहलानी सुपर स्पेशालिटी सेंटर
प्रेस रिलीज
Saturday, July 20, 2019 | 04:25 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आरोग्य सेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत रुबी हॉल क्लिनिकने कविता अ‍ॅंड गोपाल निहलानी सुपर स्पेशालिटी सेंटर सुरू केले आहे. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ निहलानी कुटुंबाने यासाठी योगदान दिले आहे. याचे उद्घाटन हॉटेल कोनराड येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात व डॉ. पी. के. ग्रांट यांच्या जन्मदिनी करण्यात आले. भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

या केंद्रामध्ये अनेक अद्ययावत सुविधा आहेत. यामधील आँकोलॉजी युनिटमध्ये कर्करोगाशी लढा देण्यासाठी वेरियन कंपनीचे ट्रु बीम एसटीएक्स हे अद्ययावत उपकरण आहे. याचे उद्घाटन सुनिता कल्याणी यांच्या हस्ते झाले. सेंटर ऑफ युरोलॉजीमध्ये भारतातील पहिले कार्ल स्टोर्जचे मॉड्युलिथ एसएलएक्स एफ-टू कनेक्ट हे अद्ययावत युरोलॉजीकल वर्क स्टेशन आहे, ज्यामुळे प्रोस्टेट कर्करोग व मुत्रपिंडसंबंधी आजारांच्या उपचारामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. 

पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्सेस हे समर्पित न्युरो इंटरव्हेंशनल कॅथलॅबसह पुण्यातील पहिले व्यापक न्युरोसायन्सेस केंद्र असेल व त्याचे उद्घाटन वेंकटेश्‍वरा हॅचरीज लिमिटेडच्या व्यवसाय विभागाचे संचालक डॉ. जी. एस. मोंगली यांच्या हस्ते करण्यात आले. राजीव बजाज यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या बजाज न्युक्लिअर मेडिकल सेंटरमुळे रुबी हॉल क्लिनिक हे जीई एसपीईसीटी सीटी मशीन असणारे आशियातील पहिले व एकमेव हॉस्पिटल व जीई डिस्कव्हरी एमआय पेट सीटी स्कॅनर असणारे भारतातील एकमेव हॉस्पिटल आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘प्रत्येक नवीन पुढाकारासह आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाची व वैद्यकीय सल्लागारांना कुठल्याही अडथळ्याविना आरोग्यसेवा पुरविण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करत आहोत. या जागतिक दर्जाच्या सेंटरद्वारे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे पालन करत अद्ययावत उपचार रुग्णांना मिळतील; तसेच त्यांना अद्वितीय आरोग्य सेवा अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करू.’

रुबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट व व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. पी. के. ग्रांट म्हणाले, ‘हे केंद्र प्रत्यक्षात स्थापन होण्यामागे अनेक लोकांचे योगदान आहे. लोककल्याण हे आपल्याला पुढे चालवते व आपल्या समाजाला समृद्ध करते, असा आमचा विश्‍वास आहे. या अमूल्य योगदानांच्या सहकार्याने दीर्घकालीन वारसा पुढे शाश्‍वतरित्या नेण्यास आम्हाला मदत मिळाली आहे. नेहमीप्रमाणे रुग्णसेवा हे आमच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search